आईच्या डोळ्यासमोर 20 दिवस तडफडत होता 12 वर्षांचा चिमुकला, 3 इंजेक्शन दिले तरी मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लेकाला वाचवण्यासाठी वणवण फिरली आई, पण नियतीने डाव साधला! भिवंडीत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; जबाबदार कोण?
ज्या वयात हातांत खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या १२ वर्षांच्या कोवळ्या वयात एका मुलाला मृत्यूने कवटाळलं. हसता खेळता १२ वर्षांचा मुलगा आई वडिलांच्या डोळ्यादेखत गेला. आई हताश होती, उपचार करण्याइतके अमाप पैसे नव्हते. तरीही त्यांच्या परीनं त्यांनी केलं मात्र मुल वाचू शकलं नाही. भिवंडीत एका भटक्या कुत्र्याने घेतलेला चावा या मुलाच्या जिवावर बेतला. १० जानेवारीला घडलेल्या या घटनेनंतर तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाने ३० जानेवारीला अखेरचा श्वास घेतला.
१० जानेवारी रोजी खेळता खेळता या मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याच्या चेहऱ्याला जखम झाली होती. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तिथे त्याला एंटी रेबीज आणि टीटी इंजेक्शन देण्यात आलं. तिथे इंजेक्शनची कमतरता असल्याने डॉक्टरांनी त्याला ठाण्यात रेफर केलं. एआएस इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांनी ठाण्यातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं असा सल्ला दिला.
advertisement
कुटुंबियांना तो खर्च परवडणारा नव्हता, याशिवाय भिवंडीहून ठाण्याला अप डाऊन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे कुटुंबियांनी भिवंडीतील सरकारी रुग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल करण्याचा आपला मानस सांगितला आणि त्यानुसार त्यांनी केलं. भिवंडीतील डॉक्टरांचे मते, सगळे उपचार मुलाला व्यवस्थित देण्यात आले होते. त्यानंतर मुलाला उर्वरित तीन इंजेक्शन दिली मात्र 27 जानेवारीपासून पुन्हा तब्येत बिघडली.
advertisement
भिंवडीहून त्याला ठाण्यात आणि ठाण्यातून कस्तुरबामध्ये रेफर करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी भिवंडीतील सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर त्यांनी व्यवस्थित उपचार केले नाहीत असा आरोप केला आहे. तिथे उपचार होत नाही तर फक्त ठाण्यात रेफर करतात. हामिद खान असं चिमुकल्याचं नाव आहे. या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भिवंडीतील डॉक्टरांच्या मते ह्या मृत्यूला रेबिज नाही तर अन्य कारणही कारणीभूत असू शकतं. रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, मुलाचा मृत्यू नक्की रेबीजमुळेच झाला की अन्य काही कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईच्या डोळ्यासमोर 20 दिवस तडफडत होता 12 वर्षांचा चिमुकला, 3 इंजेक्शन दिले तरी मृत्यू









