Interesting Facts : घड्याळात '11:11' वाजताच विष मागितल्याने खरंच हवं ते मिळतं का? ही अंधश्रद्धा की सत्य?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Does 11:11 portal really works : एक कृती म्हणजे घड्याळात 11 वाजून 11 मिनिटं झाले आणि आपले अचानक त्याकडे लक्ष गेले तर इच्छा व्यक्त करणे. असे केल्याने आपल्याला हवे ते मिळते अशी मान्यता आहे. मात्र हे खरंच खरं आहे का? याला काय आधार आहे? चला जाणून घेऊया.
मुंबई : तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम किंवा बऱ्याच प्रकारच्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्सबद्दल ऐकलं असेल. एखादी कृती केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते, अशा अनेक मान्यता आहेत. यासाठी कुणी व्हिजन बोर्ड बनवतो तर कुणी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतो. यापैकीच एक कृती म्हणजे घड्याळात 11 वाजून 11 मिनिटं झाले आणि आपले अचानक त्याकडे लक्ष गेले तर इच्छा व्यक्त करणे. असे केल्याने आपल्याला हवे ते मिळते अशी मान्यता आहे. मात्र हे खरंच खरं आहे का? याला काय आधार आहे? चला जाणून घेऊया.
आकर्षणाचा नियम आणि 11:11 चा संबंध काय?
अमर उजालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, 11:11 हा आकर्षणाच्या नियमाशी संबंधित भाग आहे. अशी मान्यता आहे की, जेव्हा तुम्ही घड्याळात ही वेळ पाहता तेव्हा विश्व तुमच्या इच्छा पूर्ण असते. त्या क्षणी तुम्ही जे काही मनापासून मागत असाल किंवा ज्याचा विचार करत असाल,ते लवकरच तुम्हाला मिळते. म्हणूनच कायम सकारात्मक विचार करावा असे आकर्षणाचा नियम सांगतो.
advertisement
11:11 चे आध्यात्मिक महत्त्व काय?
हल्ली 11 हा एक मास्टर नंबर मानला जातो. तो अंतर्ज्ञान आणि स्वतःमधील थेट संबंध असल्याचे मानले जाते. ही वेळ पाहून तुम्ही तुमच्या इच्छा आणि विचार प्रकट कराव्या असा विश्वाकडून एक संकेत असतो. यावेळी प्रकट केलेली इच्छा लवकर पूर्ण होते असे मानले जाते.
11:11 ला जागृतीचा कॉल का म्हणले जाते?
काही लोकांच्यामते, 11:11 हा जागृतीचा कॉल असतो. ही वेळ आपल्या जीवनाबद्दल जागरूक राहण्याची, आपल्या कृती आणि खऱ्या हेतूंशी जुळवून घेण्याची आठवण करून देते. यावेळी तुम्ही जाणीवपूर्वक विचार करून तुमचे स्वतःचे नशीब घडवू शकता.
advertisement
11:11 या वेळी खरंच देवदूत सोबतअसल्याचे संकेत असतात?
अनेकांचा असा विश्वास आहे की, 11:11 ही वेळ देवदूतांचे किंवा दैवी शक्तींचे प्रतीक आहे. ही संख्या त्यांचे प्रेम, संरक्षण आणि मार्गदर्शन दर्शवते. ते आपल्याला आठवण करून देते की, तुम्ही एकटे नाही आहात आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
हे खरंच काम करते का?
याचे उत्तर तुम्ही कशावर विश्वास ठेवता यावर अवलंबून आहे. बरेच लोक म्हणतात की, त्यांच्या 11:11 च्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि ते या प्रथेलाच श्रेय देतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मनापासून हव्या असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यास मदत झाली. जरी विज्ञान अजून 11:11 च्या गूढ बाजूला पाठिंबा देत नसले तरी, मानसशास्त्र केंद्रित संकल्पाची शक्ती मान्य करते. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाची तीव्रतेने कल्पना करता, तेव्हा ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलण्याची शक्यता जास्त असते. त्या अर्थाने, 11:11 ही वेळ कदाचित जादू नसून, मानसिकतेबद्दल अधिक आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 11:32 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Interesting Facts : घड्याळात '11:11' वाजताच विष मागितल्याने खरंच हवं ते मिळतं का? ही अंधश्रद्धा की सत्य?









