दोन बायका फजिती ऐका, तिसऱ्या लग्नाचा बेत अंगाशी! कोर्टाने जन्माची अद्दल घडवली! नवरदेवाचे कारनामे वाचून बसेल धक्का
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ahilyanagar Court Marital Fraud Case : फिर्यादी महिलेला अंधारात ठेवून त्याने हा विवाह उरकला होता, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याचे हे पितळ उघडे पडले आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
Ahilyanagar Court Marital Fraud Case : कोर्टात खुटे पुरावे सादर करणे हा फार मोठा गुन्हा मानला जातो. अशातच अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, दोन पत्नी असतानाही तिसऱ्या लग्नाचा घाट घालणाऱ्या एका व्यक्तीला कायद्याने चांगलाच धडा शिकवला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एल. एस. पाढेण यांनी या नवरदेवाची रवानगी थेट तुरुंगात केली आहे. आरोपीने चक्क घटस्फोटाचे बनावट कागदपत्रे दाखवून एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कोर्टाच्या एका निकालाने त्याचे सर्व मनसुबे धुळीला मिळवले आहेत.
घटस्फोट झाल्याचा खोटा पुरावा सादर
जयदीप कौशिक मोरे असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी फसवणूक केली होती. त्याचे यापूर्वी 2 विवाह झाले होते, तरीही तिसरे लग्न करण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचा खोटा पुरावा सादर केला. फिर्यादी महिलेला अंधारात ठेवून त्याने हा विवाह उरकला होता, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याचे हे पितळ उघडे पडले आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
advertisement
जयदीपचा खोटारडेपणा सिद्ध
तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात चालले. सरकारी पक्षाच्या वतीने 4 महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले, ज्यांच्या साक्षीनिशी जयदीपचा खोटारडेपणा सिद्ध झाला. न्यायालयाने या घटनेला अतिशय गांभीर्याने घेतले असून, केवळ कागदपत्रांची फसवणूकच नाही तर एका महिलेच्या विश्वासाला तडा दिल्याचा ठपका ठेवत त्याला दोषी ठरवले.
advertisement
नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश
दरम्यान, न्यायालयाने आरोपी जयदीप मोरे याला 2 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, दंडाची ही सर्व रक्कम पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात पुराव्याअभावी इतर 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असली, तरी मुख्य आरोपीला मात्र आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
दोन बायका फजिती ऐका, तिसऱ्या लग्नाचा बेत अंगाशी! कोर्टाने जन्माची अद्दल घडवली! नवरदेवाचे कारनामे वाचून बसेल धक्का









