अजब प्रकरण! गाडी घसरून पत्नीचा मृत्यू; पतीच 'आरोपी', पुण्यात नेमकं काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शर्ली एन. अन्थोनी असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून एनडीए रस्त्यावरील भाजी मंडई चौकातून जात होत्या
पुणे: पुण्यातील उत्तमनगर परिसरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीसोबत दुचाकीवरून जात असताना वाहन घसरून झालेल्या अपघातात एका ३७ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, या प्रकरणात आता एक धक्कादायक वळण आले असून, निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने गाडी चालवून पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी थेट पतीविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
शर्ली एन. अन्थोनी (वय ३७, रा. कोंढवा गेट, उत्तमनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून एनडीए रस्त्यावरील भाजी मंडई चौकातून जात होत्या. यावेळी पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन जोरात घसरले. या भीषण अपघातात शर्ली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
पतीवर का झाली कारवाई?
अपघाताचा तपास केल्यानंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले की, अपघाताच्या वेळी दुचाकीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. भरधाव वेगात दुचाकी चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळेच हा अपघात झाला आणि एका महिलेचा बळी गेला. यामुळे उत्तमनगर पोलिसांनी संबंधित पतीविरुद्ध 'अपघातास कारणीभूत ठरून मृत्यूस जबाबदार असणे' या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 10:53 AM IST










