Sanjay Shirsat : 'माझ्या श्रद्धांजलीची वेळ आली असती...', अजितदादांच्या निधनानंतर थोडक्यात वाचले संजय शिरसाट; भरसभेत सांगितला किस्सा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanjay Shirsat narrowly escaped death : बजाजनगर येथील जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या सभेत मंत्री शिरसाट यांनी थरारक अपघाताचा अनुभव कथन करत अपघातातून वाचवलं नाहीतर माझी श्रद्धांजलीची वेळ आली असती, असं म्हणत भावनिक केलं.
Minister Sanjay Shirsat Speech : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना आता जिल्हापरिषद निवडणुका देखील तोंडावर आहेत. अशातच आता निवडणूक तोंडावर असताना देखील प्रचार थंडावल्याचं पहायला मिळतंय. अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भरसभेत धक्कादायक किस्सा सांगितला. बजाजनगर येथील जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या सभेत मंत्री शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं.
काय म्हणाले संजय शिरसाट?
मी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बजेट असलेला मंत्री आहे. साडे बावीस हजार कोटींचं माझं एकट्याचं बजेट आहे. त्यावर किती झिरो असतात एकदा विचारून तर घ्या, असं संजय शिरसाट म्हणाले. एक उमेदवार आहे, तो मतदारांना फोन पे करतो म्हणाला. लोकांना मुर्ख बनवणं सोपं आहे का? गेले 20 वर्ष मी आमदार आहे. पण माझ्या मतदारसंघात कुणाला वाटत नाही की मंत्री आहे, असं शिरसाट म्हणाले.
advertisement
मी थोडक्यात वाचलो, श्रद्धांजलीची वेळ आली असती... - शिरसाट
कालची घटना सांगतो, माणसाचा काही भरोसा नाही. अजितदादा आपल्यातून गेले कुणाला काही वाटलं तरी होतं का? काल माझीपण बारी आली होती पण मी थोडक्यात वाचलो. येताना गाडी खड्यात आदळली अन् गाडीचे दोन्ही टायर बर्स्ट झाले. गाडी साधीसुधी नव्हती मर्सडीज गाडी होती. दुसरी एक गाडी होती, ती आत्तापर्यंत घरी नाही आली. काय भरोसा माणसाच्या आयुष्याचा... जर काही काल मला झालं असतं तर तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती. तुम्हाला नशिबाने काय मिळतं, त्यावर तुम्ही आम्ही जिवंत आहोत.
advertisement
खुर्ची जिंकली माणूस हरला
दरम्यान, मी आयुष्यभर सगळ्यांना सांगतो. आजचा दिवस चांगला जाऊ द्या. उद्याची चिंता करू नका, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं. उमेदवारांनो टेन्शन काही घेऊ नका बाबांनो.. असं म्हणत शिरसाट यांनी उमेदवारांच्या डोक्यावरील टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न केला. शिरसाट यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर देखील टीका केली होती. 'राजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरला, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sanjay Shirsat : 'माझ्या श्रद्धांजलीची वेळ आली असती...', अजितदादांच्या निधनानंतर थोडक्यात वाचले संजय शिरसाट; भरसभेत सांगितला किस्सा!








