'रो हाऊस विकणे आहे' बाहेर बोर्ड! पण आत भलतंच कांड, 5 महिला अन्.. जालन्यात मोठी कारवाई
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: महिला रो हाऊस विक्रीसाठी ठेवल्या असल्याची बतावणी करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जालना: रो हाऊस विक्रीच्या नावाने जालन्यात धक्कादायक कांड सुरू असल्याचं समोर आलंय. जालना पोलिसांनी थेट कारवाई करत रो हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. जालना शहरातील मंठा अंबड बायपास जवळील परिनिका हॉस्पिटलच्या मागे विरळ वस्तीत असलेल्या रो हाऊसमध्ये हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी दलाल प्रताप लहाने, ग्राहक मनोज सातभाये यांना ताब्यात घेतले असून पाच पीडित महिलांची सुटका केली आहे.
पोलिसांना राजुरेश्वर कंस्ट्रक्शन नावाने असलेल्या रो हाऊसमध्ये प्रताप लहाने हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर नेहमीप्रमाणे बनावट ग्राहक पाठवून कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी थेट ठिकाणी छापा टाकला. यावेळी प्रताप लहाने, ग्राहक मनोज सातभाये यांसह पाच महिला रो हाऊसमध्ये आढळून आल्या. त्यांच्या ताब्यातून 23 हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली.
advertisement
2 ते 5 हजार रुपये होता दर
परिनिका हॉस्पिटलच्या मागे विरळ वस्ती आहे. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर महिला रो हाऊस विक्रीसाठी ठेवल्या असल्याची बतावणी करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, पोलिसांनी खात्री केल्यानंतर कारवाई केल्याने दिशाभूल करण्याचा डाव फसला. या ठिकाणी ग्राहकांकडून 2 हजार ते पाच हजार रुपये घेतले जात होते. हे पैसे महिला आणि मालक वाटून घेत असल्याचे समजते.
advertisement
दरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित महिला आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस स्थानकात गर्दी करत आमच्या महिला अशा नाहीत, असा सूर आळविला. परंतु, पोलिसांनी ज्यांचे काम त्यांनीच थांबा अशी तंबी दिल्यानंतर नातेवाईक स्थानकातून बाहेर गेले. यासंबंधी ते पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 10:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
'रो हाऊस विकणे आहे' बाहेर बोर्ड! पण आत भलतंच कांड, 5 महिला अन्.. जालन्यात मोठी कारवाई









