बॉलिवूडसाठी IIT शिक्षणाला मारली लाथ,' घर से निकलतेही ..' फेम अभिनेत्री झाली गूगलची CEO

Last Updated:

Bollywood Actress : बॉलिवूडसाठी IIT शिक्षण सोडले होते. आता कॉर्पोरेट कंपनीत झाली CEO . बॉलिवूडमध्ये दिग्गजांसोबत केले होते काम.

News18
News18
बॉलिवूडमध्ये आपलं नशीब चमकवण्यासाठी कित्येक अभिनेत्री येतात. मोठं नाव कमवतात.पण कधी कधी असे होते की त्यांची काही कारणास्तव बॉलिवूड मधून हाकलपट्टी होते.अशा खूप अभिनेत्री आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये पाय स्थिर ठेवता आले नाहीत.पण एक अशी अभिनेत्री आहे की तिने कॉर्पोरेट जगासाठी बॉलिवूडला लाथ मारली. तिने कॉर्पोरेटमध्ये आपलं नाव मोठे केले.
बॉलिवूडच्या सिल्वरस्क्रीनवर आपले साधेपण आणि सुंदर हास्याने साऱ्या चाहत्यांचे मन जिंकले होते. ती बॉलिवूड होती अभिनेत्री मयुरी कांगो. तिने 90 च्या दशकात चांगले हिट चित्रपट दिले होते. ही साधी सरळ मुलगी त्याकाळातील नॅशनल क्रश होती. ती चक्क भाईजान सलमान सोबत 'पापा कहते है' आणि 'बेताबी' या चित्रपटातून दिसली होती.पण ती अचानक कुठे गायब झाली ? हा मोठा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. खरंतर तिने त्यानंतर बॉलिविूडला अलविदा केला होता. तिने आपल्या करियरचा मार्ग बदलला.
advertisement
ती सध्या काय करते ?
अभिनेत्री मयुरी कांगोने सिस्को ग्लोबल टेक कंपनीमध्ये काम केले होते. त्यानंतर 2008 मध्ये गूगल इंडिया कंपनीसोबच जॉईन झाली. मयुरी आता पब्लिसिस ग्रुपच्या ग्लोबल डिलीवरी मध्ये सीईओ या पदावर काम करत आहे.अभिनेत्री मयुरी म्हणाली की, "अभिनयाने मला एक क्रिएटीव्हीटी आणि चांगले विचार दिले. ज्यामुळे टेक्नॉलॉजी आणि एजुकेशन सेक्टर मध्ये काम करताना मला 'लार्ज स्केल इम्पॅक्ट'बनायची संधी मिळते."
advertisement
अभिनेत्री मयुरीने केलेले चित्रपट
मयुरीने अभिनयाच्या लहान प्रवासात अंदाजे पाच चित्रपट आणि दोन टिवी शो केले होते.'एलओसी कारगील'या चित्रपटाने तिला खूप ओळख दिली. सगळ्यांना वाटले होते की आता मयुरी बॉलिवूडचा मोठा प्रवास करेल.पण या चित्रपटानंतर तिने आपल्या अभिनय करियला पूर्णविराम दिला.
मयुरीने इकोनॉमिक्समध्ये डिग्री पूर्ण केली आणि त्यानंतर 2004 मध्ये तिने एमबीए केले. तिला समजले की आपली आवड ही कॉर्पोरेटमध्ये आहे तेव्हा तिने सिनेसृष्टी सोडून कॉर्पोरेटमध्ये काम सुरु केले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडसाठी IIT शिक्षणाला मारली लाथ,' घर से निकलतेही ..' फेम अभिनेत्री झाली गूगलची CEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement