Aajache Rashibhavishya : आर्थिक अडचणी होणार दूर, हाती घेतलेले कामही पूर्ण, आज तुमच्या राशीचे भविष्य काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Aajache Rashibhavishya : आज तुमची राशी काय सांगते? आजच्या दिवसात काय होणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क राहावे लागणार, कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहा 12 राशींचे आजचे भाकीत.
मेष राशी - आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आजचा दिवस हा तुम्हाला मध्यम जाणार आहे. सकाळी आनंद आणि सायंकाळी थोडे कष्ट घ्यावे लागतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
advertisement
सिंह राशी - आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आजचा दिवस हा तुम्हाला मध्यम जाणार आहे. सकाळी आनंद आणि सायंकाळी थोडे कष्ट घ्यावे लागतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
कन्या राशी - चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आज तुमचा दिवस हा खर्चिक असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
तुळ राशी - नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. आज घरी परिवारातील पाहुणे मंडळी येतील. प्रेमाचा आनंद घेता येईल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. आज तुम्हाला प्रवासाचा योग आहे आणि त्यासाठी कंटाळा तुम्ही करू शकता. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
मकर राशी - आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो किंवा ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement


