Success Story : 15 वर्षांपूर्वी लावलं डोक, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, वर्षाला लाखांत कमाई

Last Updated:

शेतकरी सदाशिव भोपळे हे 2010 पासून अद्रक शेती करत आहेत. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कावड येथील शेतकरी सदाशिव भोपळे हे 2010 पासून अद्रक शेती करत आहेत. यंदा देखील त्यांनी दोन एकर क्षेत्रात 13 जून रोजी अद्रकीची लागवड केली. तब्बल सहाव्या महिन्यात आता अद्रक पिकाची काढणी सुरू झाली आहे, या पिकाचे जवळपास 150 क्विंटल उत्पादन निघेल. याबरोबरच 6 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा देखील सदाशिव भोपळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली. तसेच अद्रक शेती कशा पद्धतीने करावी, या शेतीची विशेषता काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
सदाशिव भोपळे यांनी जूनमध्ये अद्रक लागवड केल्यापासून ते काढणीला येईपर्यंत जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. सुरुवातीच्या वेळेला नांगरणी केली, त्यानंतर सहा ट्रॉली शेणखत टाकण्यात आले, रोट्या करण्यात आल्या तसेच बेड पाडले आणि कोंबडी खत यासह विविध खतांचा भेसळ डोस जमिनीत टाकून अद्रकीची लागवड केली. लागवड केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये वॉटर सोल्युबल, रासायनिक खत, फवारण्या केल्या आहेत. अद्रक पिकाला पाण्याची व्यवस्था म्हणून ठिबकने पाणी दिले जाते.
advertisement
सध्या अद्रक उत्पादन काढणीचा कालावधी असल्यामुळे जवळपास 70 जणांना या पिकाची काढणी होईपर्यंत म्हणजे जवळपास दोन ते तीन दिवस रोजगार प्राप्त झाल्याने कामगार देखील समाधान व्यक्त करत आहेत. तसेच तरुण आणि इतर शेतकऱ्यांना देखील अद्रक शेतीत यावे, मात्र यामध्ये वेळेचे गणित अचूक लागते तेव्हाच हे पीक फायदेशीर ठरते. अद्रकीचे उत्पादन आणि चांगले उत्पन्न घेण्यासाठी मुख्यतः बुरशीनाशक फवारणी, कीटकनाशक, या सर्व बाबी वेळोवेळी देणे गरजेचे असल्याचे देखील भोपळे यांनी म्हटले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 15 वर्षांपूर्वी लावलं डोक, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, वर्षाला लाखांत कमाई
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement