Pune Crime : पत्नी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात, गजा मारणेची 'फोनाफोनी' सुरू; कोर्टाने दिला 'जोर का झटका'

Last Updated:

Pune Gaja marane under police surveillance : गजा मारणेने पत्नीच्या प्रचारासाठी फोनाफोनी सुरू केली आहे. सध्या तडीपार असताना ही मारणेनं फोन वरून निवडणुकीत प्रभाव पाडायचा प्रयत्न करतोय.

Pune Crime Gangster gajanan marane under police surveillance
Pune Crime Gangster gajanan marane under police surveillance
Pune Crime Gangster Gajanan Marane : पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (खरात गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोथरूड भागातून जयश्री निवडणूक लढवित आहेत. अशातच आता पुण्यात अनेक गुन्हेगारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने आता पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी गजा मारणे याचे हात गुंडाळले आहेत.

गजा मारणेची पत्नीच्या प्रचारासाठी फोनाफोनी

मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. मारणे बाहेर आल्यानंतर त्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पण न्यायलयाने गजा मारणेला काही अटी शर्तीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, गजा मारणेने पत्नीच्या प्रचारासाठी फोनाफोनी सुरू केली आहे. सध्या तडीपार असताना ही मारणेनं फोन वरून निवडणुकीत प्रभाव पाडायचा प्रयत्न केल्याने पुणे पोलिसांच एक पथक मारणेच्या मागावर आहे.
advertisement

पुणे पोलिसांनी कडक पाऊलं उचलली

गजा मारणेला पुणे शहरात येऊ द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. पत्नीच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यात येऊ द्यावं म्हणून गजा मारणे याने न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर आता गजा मारणे फोनाफोनी करून लोकांना पत्नीला मतदान करा म्हणून आवाहन करत होता. अशातच आता गजा मारणेला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक पाऊलं उचलली आहेत.
advertisement

अमितेश कुमार म्हणाले...

दरम्यान, महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, त्यांच्या नातेवाइकांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. गजा मारणे याने काही जणांशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पत्नी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात, गजा मारणेची 'फोनाफोनी' सुरू; कोर्टाने दिला 'जोर का झटका'
Next Article
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement