Mumbai : चर्चगेट-विरारच्या सुस्साट प्रवासाला सुरक्षेचं 'कवच', ब्रेक फेल झाली तरी ट्रेन थांबणार, कशी काम करणार टेक्नोलॉजी?
Last Updated:
Kavach Safety System Update : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर कवच सुरक्षा प्रणालीचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. विरार ते चर्चगेट दरम्यान ही प्रणाली कार्यान्वित झाल्यास लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनला ओळखले जात असून आता याच एका पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. विरार ते चर्चगेट या सुमारे 60 किलोमीटर लांबीच्या मार्गावर कवच ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचे काम वेगात सुरू आहे. नेमका हा प्लान काय आणि कशा प्रकारे प्रवाशांना शिवाय लोकल प्रवासात याचा फायदा,वापर होणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई लोकलला मिळणार सुरक्षा कवच
कवच ही एक स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीमुळे रेल्वेगाड्यांचा वेग, सिग्नल आणि समोर येणाऱ्या गाड्यांमधील अंतरावर सतत लक्ष ठेवले जाते. चालकाकडून चुकून सिग्नल दुर्लक्षित झाला किंवा वेग जास्त झाला तरी ही कवच प्रणाली आपोआप ब्रेक लावून अपघात टाळणार आहे, त्यामुळे समोरासमोर धडक, सिग्नल तोडणे अशा घटना रोखणे शक्य होणार आहे.
advertisement
या प्रकल्पाअंतर्गत 60 किलोमीटर मार्गावर टॉवर उभारणीसाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. टॉवर उभारणीचे सुमारे 50 टक्के काम झाले असून 15 पैकी 14 ठिकाणी माती परीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी 12 ठिकाणी पायाभरणीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय अन् बांधकामेही सुरू आहेत.
संपूर्ण प्लॅन काय आहे?
view comments17 स्थानकांवर टीसीएएस बसवण्यात येणार असून त्यापैकी सहा स्थानकांवर काम पूर्ण झाले आहे. याशिवाय लिडार सर्वेक्षण, आरएफआयडी टॅग बसवणे आणि ऑप्टिकल केबल टाकण्याचे कामही सुरु आहे. प्रत्यक्ष परिस्थितीत प्रणालीची चाचणी घेण्यात येत असून आतापर्यंत 24 किलोमीटर मार्गावर इंजिन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 9:14 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : चर्चगेट-विरारच्या सुस्साट प्रवासाला सुरक्षेचं 'कवच', ब्रेक फेल झाली तरी ट्रेन थांबणार, कशी काम करणार टेक्नोलॉजी?











