Tilgul Ladoo Recipe : पाक न करता, हाताला चटके न देता मऊसूद तिळगुळाचे लाडूची रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Tilgul Ladoo Recipe In Marathi : तिळगूळाचे लाडू म्हणजे पाक बनवणं आलं, शिवाय काही वेळा हे लाडू कडकही होतात, दातांनी चावताही येत नाही. पण या पद्धतीने तुम्ही लाडू बनवाल तर पाक बनवण्याची गरज नाही, हाताला चटके लागणार नाही आणि अगदी हातांनीही फुटतील इतके मऊ लाडू बनतील.
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला... मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देताना आपण तिळगूळाचे लाडू देतच शुभेच्छा देतो. मकरसंक्रांती म्हणजे तिळगूळाचे लाडू आलेच आणि तिळगूळाचे लाडू बनवणं इतर लाडूंसारखे सोपे नाहीत. वळताना हाताला चटके बसतात तेव्हा कुठे हे तिळगुळाचे लाडू तयार होतात. त्यामुळे अनेक जण तिळगूळाचे लाडू बनवत नाहीत. पण आम्ही तुमच्यासाठी हाताला चटके न देता तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी आणली आहे.
तिळगूळाचे लाडू म्हणजे पाक बनवणं आलं, शिवाय काही वेळा हे लाडू कडकही होतात, दातांनी चावताही येत नाही. पण या पद्धतीने तुम्ही लाडू बनवाल तर पाक बनवण्याची गरज नाही, हाताला चटके लागणार नाही आणि अगदी हातांनीही फुटतील इतके मऊ लाडू बनतील. आता याची रेसिपीच पाहुयात.
advertisement
साहित्य
1 कप किंवा 100 ग्रॅम गूळ
1 कप किंवा 150 ग्रॅम पांढरे तीळ
दीड कप किंवा 75 ग्रॅम शेंगदाणे
1 मोठा चमचा पाणी
दीड चमचा वेलची पूड
चिमूटभर जायफळ पूड
कृती
एका पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यात एक स्टँड ठेवा. स्टँडवर एक रिकामं भांडं ठेवा आणि त्यात गूळ घाला. अशा पद्धतीने गूळ वितळवून घ्या. गूळ पूर्ण वितळला नाही तरी चालेल थोडा नरम व्हायला हवा.
advertisement
आता एक कढई घेऊन गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. त्यात तीळ घालून हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून बाजूला काढून ठेवा. आता यात शेंगदाणेही लालरस होईपर्यंत भाजून थंड करून त्याची साल काढून घ्या. मिक्सरमध्ये शेंगदाणे थोडे फिरवान नंतर यात भाजलेले तीळ यांचा एकत्र कूट करून घ्या. त्यात वितळलेला गूळ घालून सर्व मिश्रण एकसारखं होईपर्यंत वाटा. हे मिश्रण कढईत काढून मंद आचेवर साधारण 5 मिनिटं परतून घ्या. गूळ वितळायला लागल्यावर थोडंसं पाणी घालून नीट मिसळा. मिश्रण एकत्र येऊन पिठासारखा गोळा होईपर्यंत शिजवा.
advertisement
गॅस बंद करा आणि थोडे उरलेले भाजलेले तीळ घाला. सर्व साहित्य नीट मिसळा. त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून पुन्हा मिसळा. आता हे मिश्रण ताटात काढा आणि त्याचे लाडू वळा. तिळाचे लाडू तयार झाले. ज्या प्रमाणात साहित्य दिलं आहे, त्यापासून साधारण 30 मध्यम आकाराचे लाडू होतात.
advertisement
MadhurasRecipe Marathi युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही अशा पद्धतीने लाडू करून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
Location :
Delhi
First Published :
Jan 08, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Tilgul Ladoo Recipe : पाक न करता, हाताला चटके न देता मऊसूद तिळगुळाचे लाडूची रेसिपी










