कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक, कशी झाली क्रिकेटर जहीर खानची बायको? सागरिका घाटगेची हटके Love Story

Last Updated:
Sagarika Ghatge - Zaheer Khan Love Story : मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहिर खान यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते. दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली. कोल्हापूरच्या रॉयल फॅमिलीतील सागरिका झहिरच्या कशी प्रेमात पडली?
1/9
प्यार किया तो डरना क्या! मग समाज, धर्मच्या चौकटी अडथळा ठरत नाहीत. याचं एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीचं नातं तसं जुनंच आहे.

advertisement
2/9
अभिनेत्री शर्मिला टागोर-मन्सूर अली खान पतौडी, संगीता बिजलानी-मोहम्मद अझरुद्दीन, अनुष्का-विराट कोहली सारख्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटरसोबत लग्न केलं आहे. त्यातील एक जोडी म्हणजे सागरिका आणि झहीर खान.

3/9
विरुष्काइतकीच लोकप्रिय आणि तितकीच प्रेरणादायी जोडी म्हणजे सागरिका घाटगे आणि झहीर खान. कोल्हापूरच्या शाही राज घराण्याची लेक असलेली सागरिका घाटगे क्रिकेटपटू झहीर खानच्या प्रेमात कशी पडली. 2017 मध्ये त्यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. झहीर हा सागरिकापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. 

4/9
सागरिकाने 'चक दे इंडिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.  पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करत तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर तिनं 'फॉक्स' आणि 'रश' सारख्या चित्रपटांत काम केलं. करिअरच्या या टप्प्यावरच तिचं आयुष्य झहीर खानसोबत एका नव्या वळणावर आलं.

5/9
त्यांच्या प्रेमाबद्दल बोलताना सागरिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं,
त्यांच्या प्रेमाबद्दल बोलताना सागरिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं, "आमच्या आजूबाजूचे लोक अनेकदा धर्माबद्दल बोलायचे, पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. माझे पालक प्रगतीशील विचारांचे आहेत.”
advertisement
6/9
सागरिका आणि झहीर यांची पहिली भेट एका बॉलिवूड पार्टीत झाली होती. अंगद बेदी त्यांचा कॉमन फ्रेंड होता. जहीर सुरुवातीला फक्त हाय हॅलो बोलायचा. त्यामुळे सागरिकाला तो थोडा लाजाळू आणि सज्जन माणूस वाटू लागला. 

7/9
अंगद बेदी आणि इतर मित्रांनी दोघांनी अनेकदा भेट घडवून आणली. दोघांची मैत्री झाली.  हळूहळू भेटी वाढल्या, गप्पा सुरू झाल्या आणि दोघांमधील अंतर कमी होत गेलं. दोघांना खेळ खूप आवडतो. त्यांची आवड एक होती हात त्यांच्या नात्याचा भक्कम पाया ठरला. 

8/9
दोघांनाही खेळांची आवड असल्याने ते अनेकदा एकत्र गेम्स खेळत. विशेष म्हणजे, पॅडल टेनिस हा खेळ दोघांचाही आवडता होता. याच मैदानावरची मैत्री पुढे प्रेमात बदलू लागली.

9/9
मैत्री घट्ट होत गेल्यानंतर झहीरनं एका खास डिनरदरम्यान सागरिकाला आपल्या मनातली भावना सांगितली. झहीर पहिल्यांदा तिच्या वडिलांना भेटला तेव्हाच दोघांत चांगले संबंध निर्माण झाले.  माझ्या आईला माझ्यापेक्षा झहीर जास्त आवडतो, असं सागरिकाने हसत सांगितलं होतं. 

BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement