पुण्यात येणं पडलं महागात! साताऱ्याच्या आजोबांनी पिशवीत हात घातला अन् चेहरा पांढरा पडला; नेमकं काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
५ जानेवारी रोजी ते काही वैयक्तिक कामानिमित्त साताऱ्याहून पुण्यात आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते स्वारगेट एसटी स्थानक परिसरात बसमधून उतरले आणि पायी चालत जात होते.
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानक परिसरातून चोरीची एक घटना समोर आली आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतून सुमारे ३ लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ५ जानेवारी रोजी ते काही वैयक्तिक कामानिमित्त साताऱ्याहून पुण्यात आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते स्वारगेट एसटी स्थानक परिसरात बसमधून उतरले आणि पायी चालत जात होते. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सोन्याचे मौल्यवान दागिने होते.
advertisement
पिशवी तपासली अन् धक्का बसला: स्वारगेट परिसरातून जात असताना, काही वेळानंतर त्यांनी आपली पिशवी तपासली असता त्यांना मोठा धक्का बसला. पिशवीची चैन उघडून त्यातील सोन्याचे दागिने गायब झाले होते. चोरट्यांनी अतिशय शिताफीने गर्दीमध्ये या ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य केले आणि दागिन्यांची चोरी केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ३ लाख ४१ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
या चोरीप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. स्वारगेट परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते, त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 7:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात येणं पडलं महागात! साताऱ्याच्या आजोबांनी पिशवीत हात घातला अन् चेहरा पांढरा पडला; नेमकं काय घडलं?










