पुणे हादरलं! तरुणाच्या चेहऱ्याचे लचके तोडले; डोकं तोंडात धरून 10 फूट फरफटत नेलं अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे, विशेषतः कान, डोके आणि चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोडले. इतक्यावरच न थांबता, कुत्र्यांनी त्याला डोके तोंडात धरून १० फुटांपर्यंत फरफटत नेले.
पुणे : पुण्यातील नऱ्हे परिसरात एका तरुणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याचे लचके तोडल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत तोल जाऊन पडलेल्या या तरुणाला कुत्र्यांच्या टोळक्याने तब्बल १० फूट फरफटत नेले, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. अक्षय प्रकाश चव्हाण (रा. धायरी) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अक्षय चव्हाण आणि त्याचा मित्र सुनील बावधने हे नऱ्हे-वडगाव रस्त्यावरील एका वाईन शॉप शेजारील रस्त्यावर आले होते. मद्यप्राशन केल्यामुळे अक्षयचा स्वतःच्या शरीरावर ताबा नव्हता. एका चढणीवर तोल जाऊन अक्षय जमिनीवर पडला. तो खाली पडताच परिसरातील ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हिंस्त्र हल्ला केला.
advertisement
अक्षय नशेमध्ये असल्याने त्याला कुत्र्यांचा प्रतिकार करता आला नाही. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे, विशेषतः कान, डोके आणि चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोडले. इतक्यावरच न थांबता, कुत्र्यांनी त्याला डोके तोंडात धरून १० फुटांपर्यंत फरफटत नेले. या भीषण हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ झाला आणि बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिला.
हल्ला पहाटे झाला असला तरी अक्षय सकाळी नऊ वाजेपर्यंत त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून होता. अनेक नागरिकांनी त्याला पाहिले, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर सकाळी ९ वाजता स्वच्छता कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सध्या अक्षयवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेमुळे नऱ्हे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 6:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! तरुणाच्या चेहऱ्याचे लचके तोडले; डोकं तोंडात धरून 10 फूट फरफटत नेलं अन्...









