Farmer ID नसल्यास शेतकऱ्यांना या 6 योजनांचा लाभ मिळणार नाही

Last Updated:

Agriculture News : राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे.

Farmer ID
Farmer ID
मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे. मात्र आता शासनाकडून शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा Farmer ID काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Farmer ID काढणे अत्यावश्यक ठरणार आहे.
advertisement
Farmer ID म्हणजे काय?
Farmer ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा एक ओळख क्रमांक आहे. आधार, सातबारा उतारा, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक यांच्याशी हा ID जोडलेली असते. या ओळखीच्या आधारे शेतकऱ्याची जमीन, पीक, पीक पद्धत आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवला जातो. शासनाच्या मते, यामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे.
advertisement
Farmer ID नसेल तर कोणते लाभ मिळणार नाहीत?
Farmer ID नसल्यास शेतकऱ्यांना खालील महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात
पीएम किसान योजना
दरवर्षी 6 हजार रुपये थेट खात्यात जमा होणाऱ्या या योजनेचा लाभ Farmer ID शिवाय पुढे मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
advertisement
पीक विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी Farmer ID आवश्यक ठरणार आहे. ID नसल्यास विमा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
महाडीबीटीवरील अनुदान योजना
बी-बियाणे, खते, कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, पॉवर टिलर, ट्रॅक्टर यांसारख्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना Farmer ID बंधनकारक केली जाणार आहे.
advertisement
कर्ज व व्याज सवलत योजना
पीक कर्ज, अल्पमुदतीचे कर्ज, कर्जमाफी किंवा व्याज अनुदान यासाठी Farmer ID अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांना शेतकऱ्यांची माहिती पडताळणी करणे सोपे होणार आहे.
नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई
अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर अशा आपत्तीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी Farmer ID आवश्यक ठरणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी या ID च्या आधारे तयार केली जाणार आहे.
advertisement
पीक खरेदी व हमीभाव योजना
शासकीय खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत (MSP) मिळवण्यासाठी देखील Farmer ID बंधनकारक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Farmer ID का महत्वाचा?
Farmer ID मुळे बनावट लाभार्थी रोखता येतील, योजनांमध्ये पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल, असा सरकारचा दावा आहे. तसेच शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा एकत्र उपलब्ध झाल्याने भविष्यात नवीन योजना आखणे सोपे होणार आहे.
advertisement
Farmer ID कसा काढायचा?
Farmer ID ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून काढता येते. आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer ID नसल्यास शेतकऱ्यांना या 6 योजनांचा लाभ मिळणार नाही
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement