अरे बापरे! अंगारकी चतुर्थी संपताच आलं मोठं संकट, आजपासून या 3 राशींच्या अडचणी वाढणार

Last Updated:
Astrology News :  मानवी जीवन हे चढ-उतारांनी भरलेले असते. कधी यश आणि समाधान मिळते, तर कधी अडचणी आणि संघर्षांचा सामना करावा लागतो.
1/6
Astrology News
मानवी जीवन हे चढ-उतारांनी भरलेले असते. कधी यश आणि समाधान मिळते, तर कधी अडचणी आणि संघर्षांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि त्यांचे संक्रमण मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. 6 जानेवारी रोजी आलेली अंगारकी चतुर्थी अनेकांसाठी शुभ फलदायी ठरणार असली, तरी त्यानंतरचा दिवस काही राशींसाठी काळजीचा ठरू शकतो. 7 जानेवारी 2026 रोजी बुध ग्रह शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करणार असून, या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम काही राशींच्या आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक स्वरूपात दिसून येऊ शकतो, असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
2/6
astrology
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धी, संवाद, व्यवहार, व्यापार आणि निर्णयक्षमता यांचा कारक मानला जातो. 7 जानेवारी रोजी बुध ग्रह पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. पूर्वाषाढा हे शुक्राचे नक्षत्र असून, या बदलामुळे काही राशींच्या लोकांना अपेक्षित यश मिळण्यात अडथळे येऊ शकतात. विशेषतः करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चुकीचे निर्णय, गैरसमज किंवा भावनिक प्रतिक्रिया यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र योग्य उपाय आणि संयम ठेवल्यास या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करता येऊ शकते.
advertisement
3/6
वृषभ
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक ठरू शकतो. अचानक खर्च वाढण्याची शक्यता असून, गुंतवणुकीबाबत घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरेल. करिअरच्या बाबतीतही मोठे बदल किंवा निर्णय पुढे ढकललेले बरे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, तणाव किंवा किरकोळ त्रास जाणवू शकतो. या काळात स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बुधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी लहान मुलींना हिरव्या रंगाच्या वस्तू दान करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
4/6
Astrology News
कर्क -  कर्क राशीच्या लोकांना या काळात आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी गैरसमज, मतभेद किंवा अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही वादापासून दूर राहणे आणि शांतपणे आपले काम करणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मन एकाग्र न राहण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांनी नियमितपणे गणेशपूजन केल्यास मानसिक शांतता लाभू शकते, असे सांगितले जाते.
advertisement
5/6
मकर
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर हा काळ थोडा संवेदनशील ठरू शकतो. बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, कारण चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. आर्थिक बाबतीत खर्चाचे योग्य नियोजन न केल्यास अडचणी वाढू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. बुध ग्रहाच्या नकारात्मक प्रभावापासून संरक्षण मिळवण्यासाठी गायीला हिरवा चारा खायला देणे लाभदायक मानले जाते.
advertisement
6/6
Astrology News
<strong>(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement