Konkan Railway : LLT - करमाळी ट्रेनला मुदतवाढ, तारीख आणि वेळ आताच नोट करून घ्या
Last Updated:
Konkan Railway Has Extended : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी रेल्वेगाडी आता 12 फेब्रुवारीपर्यंत धावणार असल्याने गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी असल्याची तक्रार प्रवासी अनेक दिवसांपासून करत होते. सणासुदीच्या काळात तसेच सुट्टीच्या दिवसांत कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मात्र नियमित रेल्वेगाड्या कमी असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
याशिवाय काही विशेष रेल्वेगाड्या केवळ मर्यादित कालावधीसाठीच सुरू केल्या जातात. त्यामुळे नियमित गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते आणि प्रवास अधिक त्रासदायक होतो. ही गोष्ट लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
'या' गाडीच्या कालावधीत वाढ
लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते करमळी (गोवा) दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ही गाडी यापूर्वी 15 जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार होती. मात्र प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण पाहता आता ही रेल्वेगाडी 12 फेब्रुवारीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
या निर्णयामुळे कोकण आणि गोव्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दी कमी होण्यास मदत होईल तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत असून भविष्यात कोकण मार्गावर आणखी नियमित रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणीही प्रवासी करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 10:39 AM IST










