चीनमध्ये बसल्या बसल्या डॉक्टरने मुंबईतल्या रुग्णाची केली सर्जरी, भारतात पहिल्यांदाच झाली अशी सर्जरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Robtic Sugery : डॉक्टर चीनमध्ये आणि रुग्ण मुंबईत, 5000 किलोमीटर अंतरावरून झाली सर्जरी भारतात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया झाली आहे.
advertisement
मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. चीनमधील शांघाय येथील सर्जनने ही शस्त्रक्रिया केली. त्यांनी रुग्णांवर रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी आणि आंशिक नेफरेक्टॉमी केली. हा विज्ञानाचा आणखी एक चमत्कार आहे. आता हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
"हे शक्य झालं ते टुमाई रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टीमनमुळे. ही एक अत्याधुनिक रिमोट रोबोटिक सर्जरी आहे, ज्यामुळे डॉक्टरांना हजारो किलोमीटर अंतरावरून जटिल शस्त्रक्रिया करता येते. हे 3D HD व्हिज्युअलायझेशन आणि 5G/ब्रॉडबँड सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतं, ज्यामुळे शस्त्रक्रियेचा वेळ कमी होतो आणि रुग्णांना जलद बरं होण्यास मदत होते.
advertisement
advertisement
ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर टी.बी. युवराज जे कोकिलाबेन हॉस्पिटलमधील युरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे संचालक आहेत. ते म्हणआले, रिमोट रोबोटिक सर्जरीमध्ये उच्च दर्जाच्या शस्त्रक्रियेची क्षमता आहे. दोन प्रमुख देशांमध्ये या प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याने भारत आणि जगभरात जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)








