Charter Plane Crash: गंभीर रुग्णाला घेऊन टेकऑफ अन् 20 मिनिटात गायब, आणखी एका विमानाला अपघात, संपूर्ण घटनाक्रम
- Published by:Sachin S
Last Updated:
या विमानामध्ये एक गंभीर रुग्ण होता, त्याच्यासोबत मेडिकल टीम आणि पायलटसह एकूण ७ जण होते. रडारशी संपर्क तुटल्याने आणि
रांची: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे विमान सेवेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे. अशातच एका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या विमानामध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते. या अपघातात एका कर्मचााऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे, पण कोणतीही माहिती अद्याप समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड जिल्ह्याती रांचीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीसाठी उडालेली RAPL कंपनीची चार्टर एअर अॅम्ब्युलन्स चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथीयातू नावाच्या जंगलात कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये पायलट, क्रू मेंबरसह ७ जण प्रवास करत होते.
कुठून कुठे चाललं होतं विमान?
हे एक खासगी विमान होतं. Beechcraft King Air C90 विमान असून ते VT-AJV असं होतं. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळासाठी रवाना झालं होतं. विमानाने रांचीहून संध्याकाळी 7.11 वाजेच्या सुमारास टेकऑफ केलं होतं. पण अवघ्या २० मिनिटांमध्ये विमानाचा संपर्क तुटला. संध्याकाळी 7:34 च्या सुमारास अटाली नावाच्या भागाजवळ विमानाचा संपर्क तुटला. शेवटचा संपर्क VEC कंट्रोलवर झाला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी विमानाचा कोणताही संपर्क झाला नाही.
advertisement
रात्री 8:05 वाजेच्या सुमारास रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटराला अलर्ट करण्यात आलं. लगेच शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. पण काही वेळातच झारखंडची राजधानी रांचीच्या जंगलात हे विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली,
कोण होतं विमानात?
या विमानामध्ये एक गंभीर रुग्ण होता, त्याच्यासोबत मेडिकल टीम आणि पायलटसह एकूण ७ जण होते. रडारशी संपर्क तुटल्याने आणि ठरलेल्या वेळेत दिल्लीला न पोहोचल्याने काही तरी अघटीत घडलं असल्याचं लक्षात आलं. संध्याकाळी 7 वाजता प्रवास सुरू झाला, 90 मिनिटांनी विमान कोसळल्याचं समोर आलं. जेव्हा विमान झारखंडच्या दुर्गम भागावर होतं तेव्हा अचानक एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमानाची शेवटचं लोकेशन लातेहार आणि पलामूच्या मधल्या घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात होतं.
advertisement
खराब हवामानामुळे क्रॅश?
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण भरल्यानंतर डोंगराळ भागातून जात असताना अचानक हवामान खराब झालं असावं. जोरदार वारे आणि पाऊस सुरू होता. खराब दृश्यता किंवा तांत्रिक बिघाडामुळे विमानाने आपला मार्ग चुकला असावा किंवा क्रॅश झालं असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या भागात हे विमान कोसळलं तो लातेहार आणि पलामूचा हा भाग घनदाट जंगलाचा आहे. त्यामुळे शोध मोहिमेमध्ये अडथळा येईल. रांची सरकारकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. घटनास्थळावर पोहोचण्याचं काम सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 11:31 PM IST
मराठी बातम्या/देश/
Charter Plane Crash: गंभीर रुग्णाला घेऊन टेकऑफ अन् 20 मिनिटात गायब, आणखी एका विमानाला अपघात, संपूर्ण घटनाक्रम






