advertisement

BMC Election: फोटो गायब! काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रचारातून स्वतःलाच वगळलं, काय आहे प्रकरण?

Last Updated:

BMC Election: मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडीओ, कार्यअहवाल, माहिती पुस्तिका, पत्रके, भल्यामोठे कटआऊट्स अशा विविध कल्पना उमेदवार राबवत असतात. मुंबईत काँग्रेसच्या काही मुस्लिम महिला उमेदवारांचा प्रचार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

Rapid Read
फोटो गायब! काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रचारातून स्वतःलाच  वगळलं, काय आहे प्रकरण?
फोटो गायब! काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रचारातून स्वतःलाच वगळलं, काय आहे प्रकरण?
मुंबई:  मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडीओ, कार्यअहवाल, माहिती पुस्तिका, पत्रके, मोठे कटआऊट्स अशा विविध कल्पना उमेदवार राबवत असतात. मुंबईत काँग्रेसच्या काही मुस्लिम महिला उमेदवारांचा प्रचार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही प्रभागांमध्ये महिला उमेदवारांनी स्वतःचे छायाचित्र टाळून पती किंवा वडिलांचे फोटो प्रचारसाहित्यावर झळकावल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महिला उमेदवारांच्या नावासमोर पुरुषांचे फोटो पाहून मतदारही चक्रावले आहेत.
प्रभाग क्रमांक १८४ आणि १६७ मध्ये हे प्रकर्षाने दिसून आले आहे. या दोन्ही प्रभागांतील प्रचार पत्रकांमध्ये नेतेमंडळी, पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांची छायाचित्रे ठळकपणे छापण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष उमेदवार असलेल्या महिलांचे फोटो मात्र गायब आहेत. त्यामुळे या प्रचारपद्धतीवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
साधारणपणे मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी, त्यांच्या कार्याची माहिती मिळावी आणि मतदानाचे आवाहन करता यावे, यासाठी प्रचार पत्रकांमध्ये उमेदवाराचे छायाचित्र, नाव व तपशील दिला जातो. मात्र काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक १६७ आणि १८४ मध्ये सुरू असलेला प्रचार या पारंपरिक पद्धतीला छेद देणारा ठरत आहे.
advertisement
प्रभाग क्रमांक १८४ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक बब्बू खान यांच्या पत्नी साजिदा बब्बू खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १६७ मधून अरशद आजमी यांच्या कन्या समन अरशद आजमी यांना संधी मिळाली आहे. महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे या दोन्ही प्रभागांत महिला उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रचारात उमेदवारांऐवजी त्यांच्या पती किंवा वडिलांची छायाचित्रे वापरण्यात आल्याने हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
advertisement
विशेष म्हणजे मुंबईत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्षा गायकवाड या महिला नेत्या आहेत. तसेच इंदिरा गांधी यांनी देशाचे पंतप्रधानपद कणखरपणे सांभाळून नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला उमेदवारांचेच फोटो प्रचारातून गायब असणे, हा प्रश्न पक्षांतर्गत आणि बाहेरही आश्चर्य व टीकेचा विषय ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: फोटो गायब! काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रचारातून स्वतःलाच वगळलं, काय आहे प्रकरण?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement