Navi Mumbai : निवडणुकीसाठी नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; 14 अन् 15 जानेवारी रोजी 'या' भागामध्ये 'नो-एन्ट्री'
Last Updated:
Navi Mumbai Traffic Update : नवी मुंबईतील वाशी भागात मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद ठेवून पर्यायी मार्ग देण्यात आले असून नागरिकांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : येत्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाशी परिसरात वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. वाशी विभागातील प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 साठी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था जुहूगाव येथील महानगरपालिका जलतरण तलावाच्या इमारतीत करण्यात आली आहे.
ठरवलेल्या या ठिकाणाहून 14 जानेवारी रोजी मतदानासाठी आवश्यक साहित्य आणि मतदान पेट्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान पेट्या आणि साहित्य पुन्हा याच स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
कुठून अन् कुठले मार्ग असतील बंद
कोपरखैरणे येथून वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक ब्ल्यू डायमंड चौक ते बेसीन कॅथोलिक बँक चौक या मार्गावर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कॅथोलिक बँक चौक ते परफेक्ट सिरॅमिक समोर, आयडीबीआय बँक चौक या मार्गावरही वाहतूक बंद असणार आहे.
या मार्गावर जाणाऱ्या वाहनांना कोपरी सिग्नल आणि पाम बीच रोड मार्गे पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे तसेच वाशीहून कोपरखैरणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही हाच पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मतदान काळात नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : निवडणुकीसाठी नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; 14 अन् 15 जानेवारी रोजी 'या' भागामध्ये 'नो-एन्ट्री'










