advertisement

Gas cylinder : तुमचं गॅस कनेक्शन येईल धोक्यात, हे काम करावंच लागणार, सरकारचा निर्णय

Last Updated:
गैरप्रकार रोखण्यासाठी आणि काळाबाजार थांबवण्यासाठी आता 'एक ग्राहक, एक आधार' हे सूत्र सरकारने अमलात आणलं आहे. ज्या ग्राहकांचं ई-केवायसी पूर्ण नसेल, त्यांना सरकार संशयास्पद मानून त्यांचं कनेक्शन तात्पुरतं स्थगित किंवा सबसिडी बंद करू शकतं.
1/6
जर तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. सरकारने आता गॅस कनेक्शनच्या नियमांत मोठा बदल केला असून आधार आधारित ई-केवायसी अनिवार्य केलं आहे. हे काम वेळेत पूर्ण न केल्यास केवळ तुमची सबसिडीच नाही, तर तुमचं गॅस कनेक्शनही धोक्यात येऊ शकतं. सिलिंडर बुकिंगमध्ये होणारा खोळंबा टाळण्यासाठी सरकारने आता बायोमेट्रिक कंपल्सरी केलं आहे.

2/6
गेल्या काही काळापासून गॅस सिलिंडरची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, यात अनेक 'फर्जी' किंवा एकाच नावावर असणारी अनेक कनेक्शन समोर आली आहेत. काही लोक चुकीच्या पद्धतीने सबसिडी लाटत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे.

3/6
हा गैरप्रकार रोखण्यासाठी आणि काळाबाजार थांबवण्यासाठी आता 'एक ग्राहक, एक आधार' हे सूत्र सरकारने अमलात आणलं आहे. ज्या ग्राहकांचं ई-केवायसी पूर्ण नसेल, त्यांना सरकार संशयास्पद मानून त्यांचं कनेक्शन तात्पुरतं स्थगित किंवा सबसिडी बंद करू शकतं.

4/6
केवायसी  म्हटलं की आपल्याला गॅस एजन्सीच्या लांबच लांब रांगा आणि तासनतास वाया जाणारा वेळ आठवतो. पण यावेळी सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच हे काम घरबसल्या करू शकता.

5/6
तुमच्या गॅस कंपनीचे Indane, HP किंवा BharatGas अधिकृत ॲप डाऊनलोड करा. कंझ्युमर नंबर वापरून लॉगिन करा आणि Aadhaar Authentication पर्यायावर जा.  केंद्र सरकारच्या Aadhaar FaceRD ॲपच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन करा. तुमची माहिती मॅच झाली की काही मिनिटांत तुमचं केवायसी अपडेट होईल.

6/6
अनेक ग्राहकांच्या तक्रारी असतात की गॅसची सबसिडी खात्यात जमा होत नाहीये. याचं मुख्य कारण 'अपडेट नसलेलं केवायसी' हेच असू शकतं. जर तुमची बँक माहिती आणि आधार गॅस कनेक्शनशी डिजिटल पद्धतीने लिंक नसेल, तर सरकार तुमची सबसिडी रोखून धरू शकतं. त्यामुळे भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी हे काम आजच पूर्ण करणं हिताचं ठरेल.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement