advertisement

Herbal Toothpaste : कोणतंही टूथपेस्ट वापरा, दात दुखतातच? डॉक्टरने सांगितलेलं हर्बल टूथपेस्ट बनवून एकदा ट्राय कराच

Last Updated:
Ayurvedic doctors recipe to make herbal toothpaste निरोगी दात हे निरोगी शरीरासाठी जेवढे आवश्यक असतात, तेवढेच ते आपल्या सौंदर्यात देखील भर घालतात. त्यामुळे दातांची योग्य काळजी घेणे अतिशय गरजेचं असतं. यासाठी तुम्ही घरगुती हर्बल टूथपेस्टचा वापर करू शकता. ही पेस्ट कशी बनवावी याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे.
1/7
सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयी आणि धावती जीवनशैलीमुळे दातांच्या समस्या अनेक लोकांमध्ये सामान्य बनत चालल्या आहेत. अनेकांना सतत दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे, जीभ पिवळी पडणे आणि तोंडाची दुर्गंधी यांसारख्या समस्या जाणवतात. त्यावर मात करण्यासाठी अनेकजण औषधोपचाराचा आधार घेतात.

2/7
तुम्हाला तुमचं तोंड निरोगी आणि दात मजबूत ठेवायचे असतील तर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी तुम्ही घरगुती हर्बल टूथपेस्टचा वापर करू शकता. एका आयुर्वेदिक डॉक्टरने इंस्टाग्रामवर त्यांच्या निरोगी सकाळचे रूटीन शेअर केले आहे. तसेच त्यांच्या हर्बल टूथपेस्टमधील घटकांचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. निरोगी दातांसाठी तुम्ही या निरोगी हर्बल टूथपेस्टचा वापर करू शकता.

3/7
आयुर्वेदिक डॉक्टर लवलीन कौर यांनी त्यांचं सकाळचं रुटीन इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. यात त्यांनी रोज जीभ स्वच्छ करण्यासोबतच आणि हर्बल टूथपेस्टचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी हर्बल टूथपेस्टसाठी लागणाऱ्या घटकांची देखील माहिती दिली आहे. ही हर्बल पेस्ट तुमचे दात निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

4/7
हर्बल टूथपेस्ट बनवण्यासाठी 35 ग्रॅम कडुलिंबाची पावडर, 20 ग्रॅम ज्येष्ठमधाची पावडर, 5 ग्रॅम बेकिंग सोडा, 10 ग्रॅम त्रिफळा पावडर, 5 ग्रॅम लवंग पावडर, 5 ग्रॅम वेलची पावडर, 3 ते 5 ग्रॅम दालचिनी पावडर आणि 1 छोटा चमचा सुगंधी तेल हे साहित्य लागेल.

5/7
हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि दररोज त्याने दात घासा. टूथपेस्टमधील बेकिंग सोडा तुमचे दात पांढरे ठेवण्यास मदत करतो, तर वेलची तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते. कडुलिंब, ज्येष्ठमध आणि त्रिफळा यांसारख्या घटकांमध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे दातांमध्ये जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत होते.

6/7
याशिवाय या पेस्टमध्ये असलेली लवंग दातांना किडण्यापासूनच सुरक्षित ठेवते, तसेच दातदुखीची समस्या देखील दूर करते. त्यामुळे तुम्हाला तुमचे दात आणि हिरड्या निरोगी ठेवायच्या असतील, तर ही हर्बल टूथपेस्ट तुम्ही नक्की वापरू शकता.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement