गुढी पाडव्याला घरी काय करावं? 'या' 6 गोष्टी न विसरता कराच, वर्षभर घरात राहील भरभराट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मराठी संस्कृतीत गुढीपाडवा हा केवळ सण नसून नवीन वर्षाचा आणि मांगल्याचा प्रारंभ आहे. यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा होत असून, या दिवशी घरामध्ये काही विशिष्ट पारंपरिक विधी केल्यास वर्षभर सुख, समृद्धी आणि धनाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
advertisement
अभ्यंग स्नान आणि सूर्योदय पूजा: गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंग स्नान करावे. शास्त्रानुसार, या दिवशी सुवासिक स्नानामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि नवीन वर्षाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पंचांग श्रवण आणि संकल्प: नवीन वर्षाचे पंचांग घरामध्ये आणून त्याचे पूजन करावे. या दिवशी नवीन वर्षाचे राशीभविष्य आणि 'वर्षफळ' ऐकण्याची परंपरा आहे. तसेच, या दिवशी स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी 'संकल्प' करावा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी केलेला संकल्प सिद्धीस जातो.
advertisement
पुरणपोळीचा नैवेद्य आणि दानधर्म: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरामध्ये पुरणपोळी किंवा श्रीखंड-पुरीचा नैवेद्य तयार करावा. हा नैवेद्य सर्वप्रथम गुढीला आणि देवाला अर्पण करावा. तसेच, नवीन वर्षाची सुरुवात सत्कर्माने करण्यासाठी गरजूंना अन्न, पाणी किंवा वस्त्रांचे दान करावे. यामुळे पुण्यसंचय होऊन घरात बरकत राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








