advertisement

नमो शेतकरीसाठी निधी आला, पैसे खात्यात कधी जमा होणार? माहिती आली समोर

Last Updated:

Namo Shetkari Yojana : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana
मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य शासनाने या योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी दिली असून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
पीएम किसानचा हप्ता जमा
याआधी नुकतेच नरेंद्र यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२वा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. आता या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
आठव्या हप्त्यासाठी १,७७४ कोटींची मंजुरी
शासनाच्या निर्णयानुसार, ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी असलेल्या आठव्या हप्त्यासाठी सुमारे १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
हा निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, येत्या ३ ते ४ दिवसांत हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत सात हप्ते वितरित
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी पहिला ते सातवा हप्ता यशस्वीपणे वितरित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होते. आता आठव्या हप्त्यालाही मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
लवकरच खात्यात पैसे जमा
शासनाकडून निधी वितरणाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे संबंधित यंत्रणा लवकरच पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा होऊन त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
नमो शेतकरीसाठी निधी आला, पैसे खात्यात कधी जमा होणार? माहिती आली समोर
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement