Konkan Railway: उन्हाळ्यात बसचा प्रवास नको रे बाबा; मुंबई-मडगाव दरम्यान धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळ आणि थांबा
Last Updated:
Summer Special Trains : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमुळे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसांत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता आता मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
खास उन्हाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या दोन महत्त्वाच्या विशेष गाड्यांचा समावेश असणार आहे. या विशेष गाड्यांचे वेळापत्रकही समोर आले असून प्रवाशांनी आधीच सुट्यांचे नियोजन करुन ठेवावे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार, जी पहिली विशेष गाडी (ट्रेन क्र 01171/01172)अर्थात मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान 16 एप्रिल ते 11 जून 2026 या दरम्यान दर गुरुवारी धावणार आहे. तर ही गाडी मुंबईहून मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.15 ला मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठीही मडगाव येथून ही ट्रेन सायंकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 ला पहाटे मुंबईत पोहेचेल.
advertisement
दुसरी विशेष गाडी- ट्रेन क्रमांक 01119 आणि 01120 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान असून ती 17 एप्रिल ते 12 जून 2026 या दिवसांत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी 3.15 वाजता मडगावला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी मडगावरुन हीच गाडी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
advertisement
या स्थानकावर मिळणार थांबा
या विशेष साप्ताहिक गाड्या दादर (फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडीसाठी) ठाणे, पनवेल तसेच पेण, रोहा,माणगाव,वीर,खेड,चिपळूण,सावर्डे,आरवली रोड,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधु्दुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबवणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: उन्हाळ्यात बसचा प्रवास नको रे बाबा; मुंबई-मडगाव दरम्यान धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळ आणि थांबा









