advertisement

Indian Navy Iran War: इराण-इस्रायल युद्धाच्या आगीत भारतीय नौदलाचा 'चक्रव्यूह', होर्मुझमध्ये दोन युद्धनौका तैनात, काय आहे प्लॅन?

Last Updated:

India Navy Iran War: इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका उडाला असतानाच भारताने समुद्रात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत दोन शक्तीशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत.

इराण-इस्रायल युद्धाच्या आगीत भारतीय नौदलाचा 'चक्रव्यूह', होर्मुझमध्ये दोन युद्धनौका तैनात, काय आहे प्लॅन?
इराण-इस्रायल युद्धाच्या आगीत भारतीय नौदलाचा 'चक्रव्यूह', होर्मुझमध्ये दोन युद्धनौका तैनात, काय आहे प्लॅन?
नवी दिल्ली: इराण-इस्रायल युद्ध चिघळलं असून त्याचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत. इराणच्या नियंत्रणात येणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक ठप्प आहे. त्याचा परिणाम गॅस आणि इंधन पुरवठ्यावर झाला आहे. भारतातही गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. इराणनं भारतीय गॅस टँकर जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता एका टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. या युद्धाची झळ जागतिक व्यापाराला बसू लागली असून, भारताने आपल्या आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) भारतात येणाऱ्या तेल आणि वायू टँकर्सच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने आपल्या शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत.

दोन 'टास्क फोर्स' सज्ज

advertisement
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने या मोहिमेसाठी दोन विशेष 'टास्क फोर्स' तैनात केल्या आहेत. पर्शियन आखातातून भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग प्रदान करणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित मदत करणे, ही या युद्धनौकांची मुख्य जबाबदारी असेल. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे समुद्रमार्गे होणारा भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
advertisement

'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत गस्त वाढवली

भारतीय नौदलाची जहाजे आधीच 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत या संवेदनशील प्रदेशात तैनात आहेत. मात्र, ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना 'एस्कॉर्ट' (संरक्षण) देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे आणि इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने तणाव वाढला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Indian Navy Iran War: इराण-इस्रायल युद्धाच्या आगीत भारतीय नौदलाचा 'चक्रव्यूह', होर्मुझमध्ये दोन युद्धनौका तैनात, काय आहे प्लॅन?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement