ऑन कॅमेरा बंदुकीसोबत स्टंटबाजी, एका सेकंदात तरुणाचा गेला जीव, धडकी भरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
हातात बंदूक घेऊन स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. संबंधित तरुण बंदूक हातात घेऊन खेळत होता. मात्र असं करणं त्याच्या जीवावर बेतलं आहे.
हातात बंदूक घेऊन स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. संबंधित तरुण बंदूक हातात घेऊन खेळत होता. मात्र असं करणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. चुकून बंदुकीचा ट्रीगर दाबला गेला आणि यात तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
ही घटना पूर्व दिल्लीतील दल्लुपुरा परिसरातील असून मृत पावलेल्या तरुणाचं नाव पवन असल्याची माहिती आहे. हा तरुण हातात बंदूक घेऊन स्टंटबाजी करत होता, रील शूट करत असतानाच गोळी लागून त्याचा मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पवन नावाचा तरुण आपल्या चुलत भावाच्या परवानाधारक पिस्तूलसह व्हिडिओ शूट करत होता. स्टंटबाजी करण्यासाठी त्याने पिस्तूलमध्ये मॅगझिन टाकलं, पिस्तूल लोड केली आणि ते आपल्या छातीवर टेकवली. बंदूक छातीवर टेकवताच त्याच्याकडून चुकून ट्रिगर दबला गेला आणि गोळी थेट त्याच्या छातीत घुसली. ही घटना घडताच पवन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
advertisement
यावेळी जवळच उभ्या असलेल्या भावाने तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळी थेट हृदयाला लागल्याने जखम गंभीर होती, असं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिस्तूल पवनच्या चुलत भावाची असून ती परवानाधारक आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परवानाधारक शस्त्र इतरांच्या हातात जाणे या बाबीचीही चौकशी केली जात आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 17, 2026 12:20 PM IST









