Mumbai : कामाला गेले ते परतले नाहीत; ऑफिसमध्ये लागलेल्या आगीने घेतले दोन बळी; अंधेरीतील घटना

Last Updated:

Andheri East : अंधेरीतील एका ऑफिसमध्ये लागलेल्या आगीत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

News18
News18
मुंबई : अंधेरीत बुधवारी संध्याकाळी एका गंभीर घटनेची माहिती समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील एका व्यावसायिक कंपनीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना अंधेरी पूर्वेतील चांदिवली भागातील साकी विहार रोडवरील टेक्स सेंटर येथे घडली.
अंधेरीतील कार्यालयात भीषण आग
मिळालेल्या माहितीनुसार आग तिसऱ्या मजल्यावरील 303 युनिटमध्ये लागली होती जिथे कंपनीचे ऑफिस सुरु होते. काही वेळातच ही आग कंपनीद्वारे तयार केलेल्या लिथियम-आयन बॅटरींमध्ये पसरली. यामुळे आग अत्यंत वेगाने पसरली आणि ऑफिसच्या विजेच्या वायरिंग, फर्निचर, फाइल्स, दरवाजे, फॉल्स सिलिंग आणि इतर इन्स्टॉलेशन्स जळाल्या. जरी आग तिसऱ्या मजल्यावर एवढी मोठी लागली होती की संपूर्ण इमारतीत धूर पसरला होता ज्यामुळे इमारतीतील इतर लोकांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या.
advertisement
दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्नीक्षमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. आग विझवताना ऑफिसमध्ये दोन जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
सुरुवातीच्या माहितीनुसार मृत्यू झालेले हे ऑफिसमधील कर्मचारी असण्याची शक्यता आहे, पण अधिकृत समजू शकलेले नाही. लिथियम-आयन बॅटरींमुळे आग जलद पसरली तसेच अधिक धूरामुळे हानीची शक्यता वाढली. मुंबई अग्नीक्षमन दलाच्या तासभरांच्या प्रयत्नानंतर आग ओटाक्यात आणली. यावेळी पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी बचावकार्य करण्यात सहाय्यक ठरले. ही घटना अंधेरीत कामगारांच्या आणि ऑफिसमधील सुरक्षा व्यवस्थेवरील गंभीर प्रश्न उपस्थित करते. अधिकारी पुढील तपास करत आहेत आणि मृतकांची ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : कामाला गेले ते परतले नाहीत; ऑफिसमध्ये लागलेल्या आगीने घेतले दोन बळी; अंधेरीतील घटना
Next Article
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement