Pune Crime : पुण्याच्या 80 वर्षीय आजोबांना झटपट नफ्याचा मोह आवरला नाही; एक चूक अन् 30 लाख गायब

Last Updated:

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने कर्वे रस्ता परिसरातील एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांनी लुटलं (AI Image)
सायबर चोरट्यांनी लुटलं (AI Image)
पुणे : पुणे शहरातील सायबर गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. बुधवारीच शहरातून सव्वा कोटीच्या सायबर फसवणुकीच्या घटना समोर आल्या होत्या. यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने कर्वे रस्ता परिसरातील एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी फसवणूक कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या विविध योजना सांगितल्या. "कमी गुंतवणुकीत मोठा नफा" मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.
सुरुवातीला आजोबांनी काही रक्कम गुंतवली असता, चोरट्यांनी त्यांना बनावट ॲपच्या माध्यमातून मोठा नफा झाल्याचे भासवले. हा नफा पाहून आजोबांनी अधिक गुंतवणुकीचा निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्याने एकूण २९ लाख ३० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर जमा केले. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःची मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गुंतवणुकीच्या टिप्सवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर पैसे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्याच्या 80 वर्षीय आजोबांना झटपट नफ्याचा मोह आवरला नाही; एक चूक अन् 30 लाख गायब
Next Article
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement