Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं ओळखा, वेळीच उपचारामुळे प्रकृती राहिल चांगली
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहऱ्यावर दिसणारी कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं किरकोळ वाटू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कारण या लक्षणांकडे लवकर लक्ष दिल्यानं हृदयरोग टाळता येण शक्य होतं तसंच आरोग्यही चांगलं राहतं. पाहूयात कोणती लक्षणं असू शकतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची निदर्शक.
मुंबई : आपली दिनचर्या, सवयी, आहार या सगळ्याचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. यामुळे अनेकदा हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते. कोलेस्ट्रॉल वाढतंय याची काहीवेळा लक्षणंही दिसत नाहीत. पण कधीकधी त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतात.
चेहऱ्यावर दिसणारी कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं किरकोळ वाटू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कारण या लक्षणांकडे लवकर लक्ष दिल्यानं हृदयरोग टाळता येण शक्य होतं तसंच आरोग्यही चांगलं राहतं. पाहूयात कोणती लक्षणं असू शकतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची निदर्शक.
डोळ्यांजवळ पिवळे डाग - डोळ्यांच्या किंवा पापण्यांच्या कडांभोवती लहान पिवळे डाग दिसले तर हे हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. याला झेंथेलास्मा म्हणतात. त्वचेखाली कोलेस्ट्रॉल साठल्यामुळे हे होऊ शकतं.
advertisement
वारंवार येणारे मुरुम - तेलकट त्वचा आणि ब्लॉकेजेसमुळे, हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये वारंवार मुरुमं आणि पुरळ येऊ शकतात. शरीरातील चरबीचं संतुलन बिघडल्याचं हे निदर्शक आहे.
चेहऱ्यावरचे बदल - चेहरा अधिक तेलकट झाला आणि तुमच्या नेहमीच्या दिसण्यापेक्षा वेगळा वाटत असेल, तर रक्तातील चरबीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे हे होऊ शकतं.
advertisement
डोळ्यांच्या बाहुल्यांभोवती पांढरं किंवा राखाडी वर्तुळ - कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानं कधीकधी कॉर्नियाभोवती पांढरं किंवा राखाडी वर्तुळ तयार होऊ शकतं. हे सहसा वयानुसार होते, पण तरुणांमधे हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण आहे.
चेहऱ्यावर थकवा जाणवणं आणि चेहरा निस्तेज होणं - उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि फिकट दिसते. बहुतेकदा थकवा आणि आळस आल्याचं हे निदर्शक आहे.
advertisement
ओठ फुटणं, वारंवार कोरडे होणं - ओठ वारंवार कोरडे पडत असतील, भेगा पडत असतील किंवा नेहमीपेक्षा जास्त काळे दिसत असतील तर ते शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉल असंतुलनामुळे हे होऊ शकतं.
चेहऱ्यावर सूज येणं - सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंचित सूज येणं हे देखील कोलेस्ट्रॉल वाढल्याचं निदर्शकअसू शकतं. विशेषतः डोळ्यांखाली सूज येते.
advertisement
खबरदारी आणि प्रतिबंध कसा करता येईल -
आहाराकडे लक्ष द्या - तेलकट, तळलेलं आणि जंक फूड टाळा.
दररोज किमान तीस मिनिटं व्यायाम करा आणि चालत जा.
फायबरयुक्त पदार्थ - ओट्स, फळं, भाज्या जास्त खा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
नियमित लिपिड प्रोफाइल चाचण्या करा.
कोलेस्ट्रॉल वाढणं तब्येतीसाठी जिकिरीचं असू शकतं, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 2:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं ओळखा, वेळीच उपचारामुळे प्रकृती राहिल चांगली










