Dry Skin : हिवाळ्यातही त्वचेचा ग्लो राहिल कायम, त्वचा मऊ राहण्यासाठी खास टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्यासाठी खास विंटर क्रीम आणि लोशनचा वापर केला जातो पण बाह्य उपायांबरोबरच शरीराला आतून पोषण देणं देखील महत्त्वाचं आहे.
मुंबई : हिवाळ्याची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. थंड हवेसोबत बोचरे वारे असल्यानं त्वचेच्या समस्या वाढल्यात. त्वचेत पुरेशी आर्द्रता नसेल तर त्वचा कोरडी आणि ताणलेली दिसू शकते. हिवाळ्यासाठी खास विंटर क्रीम आणि लोशनचा वापर केला जातो पण बाह्य उपायांबरोबरच शरीराला आतून पोषण देणं देखील महत्त्वाचं आहे.
हिवाळ्याच्या थंड आणि कोरड्या हवेत त्वचा मऊ कशी ठेवावी यासाठी काही टिप्स पाहूया.
दररोज पुरेसं पाणी प्या - हिवाळ्यात तहान कमी असू शकते, पण शरीराची पाण्याची गरज तीच राहते. दररोज तीन-चार लीटर पाणी प्या. कोमट पाणी किंवा डिटॉक्स वॉटर देखील पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
advertisement
त्वचेला तेल लावा - आंघोळीनंतर नारळ तेल किंवा इतर कोणतंही नैसर्गिक तेल लावल्यानं त्वचेवर एक थर तयार होतो. यामुळे ओलावा टिकून राहतो आणि थंड हवेपासून संरक्षण होतं. ही पद्धत विशेषतः कोरडी त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.
आहारात निरोगी चरबींचा समावेश करा - आहारात थोडंसं तूप देखील त्वचेसाठी खूप चांगलं आहे. यामुळे त्वचेचं आतून पोषण होतं आणि त्वचा मऊ राहते.
advertisement
व्हिटॅमिन ई - त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी व्हिटॅमिन ई उपयुक्त आहे आणि यामुळे चेहऱ्यावर चमक येते. व्हिटॅमिन ई साठी, आहारात बदाम, शेंगदाणे, बिया आणि एवोकॅडो सारखे पदार्थ खाऊ शकता.
अमीनो-कोलेजन - कोलेजन आणि अमीनो आम्ल यामुळे त्वचेची ताकद, लवचिकता आणि हायड्रेशन वाढवण्यास मदत होते. सप्लिमेंटस् घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
केवळ बाह्य उपायांनी नाहीतर योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि पुरेसं पाणी पिणं यामुळे त्वचेचं आरोग्य हिवाळ्यात चांगलं राहतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dry Skin : हिवाळ्यातही त्वचेचा ग्लो राहिल कायम, त्वचा मऊ राहण्यासाठी खास टिप्स








