11 वीमध्ये शिकणाऱ्या आदितीची कमाल, गॅस सिलेंडरच्या मदतीने बनवला हिटर, शुन्य येतंय वीजबिल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एका तरुणीने घरगुती गॅस आणि कॉपर पाईपचा वापर करत गरम पाण्याचा हीटर बनवला आहे. आदिती पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
सोलापूर : सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने घरगुती गॅस आणि कॉपर पाईपचा वापर करत गरम पाण्याचा हीटर बनवला आहे. आदिती पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. हा हीटर बनवण्यासाठी आदितीला 500 रुपयांपर्यंत खर्च आला आहे. ही संकल्पना कशी सुचली या संदर्भात अधिक माहिती विद्यार्थिनी आदिती पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
संगमेश्वर कॉलेजमध्ये 11 वी सायन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिती पाटील या तरुणीने अनोखा हीटर बनवला आहे. घरगुती गॅसला एक लहानसा कॉपरचा पाईप लावून हा हीटर बनवला आहे. गरम पाणी करण्यासाठी गॅसचा गिझर वापरत असताना दुसरा सिलेंडर वापरावा लागतो.
advertisement
तर इलेक्ट्रिक गिझर वापरात असताना लाईट बिल भरमसाठ येत असते. यावर उपाय म्हणून आदितीने स्वयंपाक करणाऱ्या गॅसला कॉपरचा पाईप जोडून त्या पाईपमधून पाणी सोडल्यावर त्या पाईपमधून गरम पाणी येते. त्यामुळे गॅस सिलेंडरची बचत, विजेची बचत आणि हीटरवर होणारा खर्च वाचणार आहे.
आदितीने हा हीटर फक्त कॉपर पाईपच्या मदतीने दोन दिवसांत बनवला आहे. चांगल्या गुणवत्तेची कॉपर पाईप वापरून हा हीटर बनवल्यास पैशाची बचत होणार आहे. आदितीने बनवलेला हा प्रयोग येणाऱ्या काळात नक्कीच फायदेशीर ठरेल. लोकांनी जास्त खर्च न करता कमी किमतीत जास्त काळ टिकणारा हा हीटर बनवून घ्यावा, असा सल्ला आदिती पाटील यांनी दिला आहे. तसेच हीटरचा वापर केल्यास हीटरवर होणारा खर्च आणि बिघाड झाल्यावर दुरुस्तीवर होणारा खर्च वाचणार हे मात्र नक्की.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 8:51 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
11 वीमध्ये शिकणाऱ्या आदितीची कमाल, गॅस सिलेंडरच्या मदतीने बनवला हिटर, शुन्य येतंय वीजबिल









