Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! लोकल तिकीट- पास काढताना मिळणार सवलत, खास App आलं!

Last Updated:

RailOne App: 'रेल वन' ॲप वापरण्यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकिट खरेदीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी ॲपच्या टीमकडून प्रवाशांना खास ऑफर दिली आहे.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! लोकल तिकीट- पास काढताना मिळणार सवलत, खास App आलं!
Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! लोकल तिकीट- पास काढताना मिळणार सवलत, खास App आलं!
आता UTS मोबाईल ॲपवर मिळणारी 'मासिक पास'ची सुविधा रेल्वेने कायमस्वरूपी बंद केली आहे. आता तुम्हाला नवीन पास काढण्यासाठी 'रेल वन' (Rail One) ॲपचा वापर करावा लागणार आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. युटीएस ॲपनंतर आता 'रेल वन' ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'रेल वन' ॲप वापरण्यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकिट खरेदीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी ॲपच्या टीमकडून प्रवाशांना खास ऑफर दिली आहे.
ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून 'रेल वन' ॲपवर अनारक्षित तिकिटं बुक करणाऱ्या प्रवाशांना 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत खास सवलत मिळणार आहे. 'रेल वन' ॲपमध्ये तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना 3 टक्के सूट मिळणार आहे. तिकिटाच्या पेमेंटसाठी ॲपच्या टेक्निकल टीमने पेमेंटसाठी काही नियम केले. तिकिट किंवा पास काढताना प्रवाशांना कोणत्याही ऑनलाइन पेमेंट ॲपचा वापर करता येणार नाही. 3 टक्के सूट मिळवण्यासाठी प्रवाशांना 'रेल वन' ॲपच्या R- Wallet Payment चा वापर करावा लागणार आहे. जर तुम्ही तेच ऑनलाइन पेमेंट मोड वापरलं तरच तुम्हाला 3 टक्के कॅशबॅक मिळेल.
advertisement
मुख्य गोष्ट म्हणजे, 3 टक्केंचा कॅशबॅक हा प्रवाशांना अनारक्षित तिकिट बुकिंगसाठीच असणार आहे. पुढच्या सहा महिन्यांसाठी म्हणजेच, 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत खास सवलत असणार आहे. आता प्रवाशांना युटीएस ॲपचा वापर करून तिकिट काढता येणार नाही. रेल्वेने प्रवाशांच्या फायद्यासाठी एकाच ॲपच्या माध्यमातून विविध सेवांचे फायदे घेता यावा आणि कोणत्याही समस्येशिवाय प्रवाशांना तिकिटं तसंच पास काढणं सुरू ठेवण्यासाठी यूटीएसमधून रेलवन ॲपमध्ये स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यूटीएस अ‍ॅपमधून Rail One मध्ये स्थलांतर होताना युजर्सला अधिकृत मार्गदर्शनात दाखवल्याप्रमाणे सोप्या स्टेप्सद्वारे क्रेडेन्शियल्स वापरता येतील.
advertisement
'रेल वन' ॲपवर प्रवाशांना कोणत्या सेवा मिळतील?
'रेल वन' ॲप हे All In One प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं. या ॲपमधून प्रवाशांना आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकिट, रिअल- टाइम ट्रेन अपडेट्स, कोच पोझिशन डिटेल्स, पीएनआर स्टेटस, फूड ऑर्डरिंग, रिफंड, रेल मदत सपोर्ट अशा सर्व सुविधा मिळणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! लोकल तिकीट- पास काढताना मिळणार सवलत, खास App आलं!
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement