Winter Care : मध आणि दालचिनीचं मिश्रण ठरेल आरोग्यासाठी वरदान, हिवाळ्यासाठी पारंपरिक औषध

Last Updated:

हिवाळ्यात ताप आणि घसा खवखवणं यासारखे हंगामी आजार वाढतात. वर्षानुवर्ष केले जाणारे काही उपाय यावर परिणामकारक ठरतात. या नैसर्गिक उपायांमुळे सौम्य हंगामी संसर्गापासून आराम मिळू शकतो. दालचिनी आणि मध हे हंगामी संसर्गांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम घटकांपैकी दोन आहेत.

News18
News18
मुंबई : हिवाळ्याची थंड हवा प्रत्येकाच्या प्रकृतीला सहन होईलच असं नाही. हिवाळ्यासोबत यावर्षी अनेक भागात प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. हिवाळ्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
हिवाळ्यात ताप आणि घसा खवखवणं यासारखे हंगामी आजार वाढतात. वर्षानुवर्ष केले जाणारे काही उपाय यावर परिणामकारक ठरतात. या नैसर्गिक उपायांमुळे सौम्य हंगामी संसर्गापासून आराम मिळू शकतो. दालचिनी आणि मध हे हंगामी संसर्गांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम घटकांपैकी दोन आहेत.
advertisement
आयुर्वेदात दालचिनी आणि मध यांचे मिश्रण एक शक्तिशाली औषध मानलं जातं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते - तज्ज्ञांच्या मते, दालचिनी आणि मध या दोन्हींमधे वैयक्तिकरित्या सूक्ष्मजीवरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. दालचिनी पावडर आणि मधामुळे ऊर्जा वाढते आणि मधामुळे ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे संक्रमणांशी लढण्यासाठी शरीर तयार होतं.
दालचिनीच्या दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे घसा खवखवणं कमी करण्यास मदत होऊ शकते.
advertisement
यात मध मिसळल्यानं नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध होतो. दालचिनी आणि मधाच्या मिश्रणानं चांगल्या बॅक्टेरियाची पातळी वाढू शकते. आतडी निरोगी नसतात तेव्हा शरीर हंगामी संसर्गांना अधिक संवेदनशील होतं. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा नैसर्गिक उपायांनी संसर्ग रोखणं शक्य होतं.
advertisement
हे मिश्रण नुसतं किंवा कोमट पाण्यासोबत घेता येतं. मध आणि दालचिनी हे मिश्रण आरोग्यासाठी वरदान आहे. असं असलं तरी समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : मध आणि दालचिनीचं मिश्रण ठरेल आरोग्यासाठी वरदान, हिवाळ्यासाठी पारंपरिक औषध
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement