Fatty Liver : फॅटी लिव्हरची लक्षणं कोणती ? फॅटी लिव्हरमुळे काय त्रास होतो ?

Last Updated:

फॅटी लिव्हर डिसीज, ज्याला अलिकडेच मेटाबॉलिक डिसफंक्शनशी संबंधित स्टीएटोटिक लिव्हर डिसीज असं म्हटलं जातं. फॅटी लिव्हर डिसीज हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या व्याधींपैकी एक आहे. प्रकृतीसाठी हा गंभीर धोका आहे. अहवालांनुसार, जगभरातील तीन प्रौढांपैकी एकाला या आजाराची लागण होते.

News18
News18
मुंबई : Fatty Liver चं प्रमाण वाढतंय. फॅटी लिव्हरला silent disease म्हणतात. कारण याचे शरीरावर परिणाम होत असतात.
फॅटी लिव्हर डिसीज, ज्याला अलिकडेच मेटाबॉलिक डिसफंक्शनशी संबंधित स्टीएटोटिक लिव्हर डिसीज असं म्हटलं जातं. फॅटी लिव्हर डिसीज हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या व्याधींपैकी एक आहे. प्रकृतीसाठी हा गंभीर धोका आहे. अहवालांनुसार, जगभरातील तीन प्रौढांपैकी एकाला या आजाराची लागण होते.
यकृतात जास्त चरबी जमा झाल्यामुळे हा विकार होतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात जास्त लक्षणं दिसू शकत नाहीत. उपचार केले नाहीत तर यकृताला सूज येणं, लिव्हर सिरोसिस आणि यकृताचा कर्करोगही होऊ शकतो.
advertisement
अमेरिकेतील एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरच्या मते, MASLD नंतर MASH म्हणजेच मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टीटोहेपेटायटीस नावाची गंभीर समस्या जाणवू शकते.
या टप्प्यावर, यकृताला सूज येऊ लागते आणि पेशींचं नुकसान होतं, ज्यामुळे यकृत फायब्रोसिस आणि हेपेटोसेल्युलर कार्सिनोमाचा धोका वाढतो. बहुतेक रुग्णांना यकृताचं नुकसान झाल्याचं कळत नाही ही यातली गंभीर बाब आहे.
advertisement
फॅटी लिव्हर आणखी धोकादायक बनवू शकणाऱ्या सवयी पाहूयात.
डॉक्टर आणि पोषण तज्ज्ञांच्या मते, काही दैनंदिन सवयींमुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.
खाण्याच्या सवयी - जास्त साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि कोल्ड्रिंक्स, चिप्स, बिस्किटं आणि फास्ट फूड सारखे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांमुळे यकृतातील चरबी वेगानं वाढते. भाज्या, संपूर्ण धान्य, काजू, ऑलिव्ह ऑइल आणि मासे असलेला आहार यकृतातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
advertisement
जीवनशैली - जास्त वेळ बसून राहणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे यकृताची चरबीची प्रक्रिया करण्याची क्षमता कमकुवत होते. यासाठी, डॉक्टरांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटं हलका व्यायाम किंवा 75 मिनिटं जोरदार व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. लिफ्टऐवजी पायऱ्या चढणंही फायदेशीर ठरू शकतं.
पूर्वीपासून असलेले आजार - लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल यामुळे फॅटी लिव्हरची समस्या जाणवू शकते. वजन नियंत्रण, चांगली झोप आणि नियमित वैद्यकीय तपासणी यामुळे हा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
advertisement
फॅटी लिव्हरला 'silent disease' म्हटलं जातं कारण या व्याधीची लक्षणं स्पष्टपणे दिसत नाहीत. सतत थकवा, उजव्या बाजूला वरती ओटीपोटात थोडं अस्वस्थ वाटणं, नियमित चाचण्यांमध्ये यकृतातील एंजाइम वाढलेले असणं किंवा स्कॅनमध्ये वाढलेले यकृत. यासाठी नियमित तपासणी करावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
advertisement
फॅटी लिव्हरच्या लक्षणांकडे नीट लक्ष दिलं तर सुरुवातीच्या टप्प्यातच चांगली सुधारणा होणं शक्य आहे. शरीराचं वजन फक्त पाच ते दहा टक्के कमी केल्यानं यकृतातील चरबीमधे लक्षणीय सुधारणा होते असं दिसून आलं आहे. अनेक संशोधनांनुसार, कॉफी प्यायल्यानं हा धोका कमी होऊ शकतो, कारण त्यातले अँटीऑक्सिडंट्स यकृताला फायदेशीर ठरतात. आहारात कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fatty Liver : फॅटी लिव्हरची लक्षणं कोणती ? फॅटी लिव्हरमुळे काय त्रास होतो ?
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement