B12 Deficiency : शरीरासाठी B12 का महत्त्वाचं ? B12 च्या कमतरतेमुळे शरीरावर काय परिणाम होतात ?

Last Updated:

व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे महिलांच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. व्हिटॅमिन बी 12 ची लक्षणं लवकर ओळखली तर ही कमतरता दूर करता येते. जाणून घेऊया कमतरता जाणवण्यामागची लक्षणं.

News18
News18
मुंबई : आरोग्य चांगलं राहावं आणि ऊर्जावान वाटावं यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पोषक घटक असणं आवश्यक आहे. पण, विशेष करुन महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पुरेसं पोषण नसेल तर तब्येतीवर त्याचे परिणाम जाणवू शकतात.
व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे महिलांच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. व्हिटॅमिन बी 12 ची लक्षणं लवकर ओळखली गेली तर ही कमतरता दूर करता येते. जाणून घेऊया कमतरता जाणवण्यामागची लक्षणं.
व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेची लक्षणं कोणती ?
सतत थकवा आणि अशक्तपणा - पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर हे व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
advertisement
रक्तपेशी - व्हिटॅमिन बी12 मुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला मदत होते आणि या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.
चक्कर येणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं - व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. यामुळे थोडंसं काम कमी केलं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसंच चक्कर येऊ शकते.
advertisement
हात आणि पायांना मुंग्या येणं आणि सुन्नपणा जाणवणं - महिलांकडून अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. नसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक आहे. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंचं नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे हात आणि पायांना मुंग्या येणं, सुन्न होणं किंवा जळजळ होऊ शकते.
मूड स्विंग्स आणि नैराश्य - व्हिटॅमिन बी12चा मेंदूतील सेरोटोनिनच्या पातळीशी थेट संबंध आहे. या कमतरतेमुळे वारंवार मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि नैराश्याची लक्षणं जाणवू शकतात.
advertisement
स्मरणशक्ती कमी होणं - लहानसहान गोष्टी लवकर विसरत असाल तर हे व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. हे मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्सवर परिणाम करते, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
चेहरा फिकट पडणं - व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे रक्त पेशींचं उत्पादन कमी होतं. यामुळे त्वचा आणि चेहरा फिकट आणि निस्तेज होते, ज्यामुळे चेहऱ्यावरची नैसर्गिक चमक कमी होते.
advertisement
जीभ आणि तोंडातले व्रण - व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे जीभ सुजणं, लाल होणं, जळजळ होणं आणि तोंडात वारंवार व्रण येऊ शकतात. शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळत नसल्याचं हे लक्षण आहे.
धडधडणं - शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हृदयावर जास्त दाब येतो. यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात किंवा धडधड वाढू शकते, व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेशी संबंधित हे एक सामान्य लक्षण आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
B12 Deficiency : शरीरासाठी B12 का महत्त्वाचं ? B12 च्या कमतरतेमुळे शरीरावर काय परिणाम होतात ?
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement