Girija Oak: ना आई, ना मम्मी, ना मॉम; गिरिजा ओकने आईसाठी ठेवलंय क्यूट नाव, सांगितला नावामागचा हटके किस्सा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak Mother Name: गिरीजा आपल्या आईला लाडाने काय हाक मारते, हे ऐकून प्रेक्षकांनाही हसू आलं.
advertisement
advertisement
advertisement
गिरीजा सांगते, "दोन-तीन दिवस गॅप पडला की आईचा फोन येतोच. मग मी आजूबाजूच्या लोकांना सांगते, आता मला २० मिनिटं द्या, कारण आता गप्पांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आईने पहिल्यांदा मारलेल्या हाकेवरूनच मला कळतं की तिची मनस्थिती काय आहे. तिने जर लांबून 'गिरीजाऽऽऽ' अशी हाक मारली की समजायचं पुढचे २० मिनिटं आपल्याला फक्त ऐकून घ्यायचं आहे!"
advertisement
advertisement
advertisement
या मुलाखतीत गिरीजाने एक मजेशीर गुपितही उघड केलं. गिरीजा आपल्या आईला लाडाने काय हाक मारते, हे ऐकून प्रेक्षकांनाही हसू आलं. गिरीजाच्या आईचं माहेरचं नाव 'बाबी' आहे, पण गिरीजा तिला कधीकधी प्रेमाने 'गट्टू' म्हणते. जेव्हा खूप दिवसांनी बोलणं होतं, तेव्हा गिरीजा हक्काने विचारते, "काय गं बाबी, काय चाललंय तुझं?"










