Pune : निर्घृण हत्याकांडाने पुणे हादरलं, 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण, 9 दिवसानंतर मृतदेह सापडला

Last Updated:

पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या घटना काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. शहरामध्ये 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

निर्घृण हत्याकांडाने पुणे हादरलं, 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण, 9 दिवसानंतर मृतदेह सापडला (AI Image)
निर्घृण हत्याकांडाने पुणे हादरलं, 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण, 9 दिवसानंतर मृतदेह सापडला (AI Image)
पुणे : पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या घटना काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. शहरामध्ये 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे. अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड, असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. अमनसिंग हा विश्रांतवाडीच्या टिंगरे नगर भागातील रहिवासी होता. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तसंच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यातही घेतलं आहे.
अमनसिंग हा 29 डिसेंबरला सकाळी त्याची सुझुकी ऍक्सेस ही दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. कामावर जात असल्याचं सांगून तो गेला पण रात्री उशीर झाला तरीही अमनसिंग घरी आला नाही, तसंच त्याचा फोनही स्विच ऑफ येत होता, त्यामुळे अमनच्या कुटुंबाने त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. अखेर अमन कुठेच सापडत नसल्यामुळे कुटुंबाने पोलीस स्टेशनला धाव घेतली. अमनची आई अनिता सुरेंद्रसिंग गचंड यांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली.
advertisement
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला, यात अमनसिंगचं शेवटचं लोकेशन लोणावळा भागात आलं, त्यामुळे पोलिसांनी लोणावळा आणि खोपोलीच्या पोलिसांसोबत संपर्क साधला. यानंतर खोपोली पोलिसांनी लोणावळा आणि खंडाळा घाट पिंजून काढला, पण त्यांना अमनसिंगबद्दल काहीही सुगावा मिळाला नाही. अखेर 9 दिवसांनंतर अमनसिंग याचा मृतदेह खेड शिवापूर भागात सापडला.
अमनसिंगचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर तपासला, ज्यातून पोलिसांना धागेदोरे सापडले. यानंतर पोलिसांनी उत्तमनगरचे रहिवासी असलेल्या प्रथमेश चिदू आढळ (वय 19) आणि नागेश बालाजी धबाले (वय 19) यांना अटक केली, तसंच त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
advertisement
या चौघांनीही जुन्या वादातून अमनसिंगचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. अमनसिंगची हत्या केल्यानंतर चारही आरोपी बेळगावला पळून गेले होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बेळगाव गाठलं आणि प्रथमेश आढळ, नागेश धबाले आणि दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. या चौघांनीही अमनसिंगचं अपहरण करून त्याच्यावर दगड आणि कोयत्याने वार करून हत्या केल्याचं कबूल केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : निर्घृण हत्याकांडाने पुणे हादरलं, 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण, 9 दिवसानंतर मृतदेह सापडला
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement