मोठी बातमी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Hidayat Patel Attack: गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोल्यात जीवघेणा हल्ला झाला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. अद्याप हल्ल्याचे कारण समोर येऊ शकलेले नाही.
हिदायत पटेल हे अकोल्यातील काँग्रेस अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. हिदायत पटेल यांनी २०१४ आणि २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढले. त्यांच्या मोहाळा गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटाने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सावधानतेची पावले म्हणून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे स्थानकि पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
advertisement
दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हिदायत पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा अकोट नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगराध्यक्ष उमेदवार अलका बोडके यांनी आरोप केला होता.
कोण आहेत हिदायत पटेल?
हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत
हिदायत पटेल यांनी २०१४ आणि २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढले
view commentsLocation :
Akola,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 3:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला









