सावधान! घर खरेदी करण्याच्या एक्साइटमेंटमध्ये तुम्हीही करू नका 'ही' चूक, अन्यथा होईल मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येते, तेव्हा आपला उत्साह गगनाला भिडलेला असतो. मात्र, या घाईघाईत आणि एक्साइटमेंटमध्ये अनेकदा आपण घराच्या सौंदर्याकडे लक्ष देतो, पण 'वास्तूकडे' दुर्लक्ष करतो.
स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येते, तेव्हा आपला उत्साह गगनाला भिडलेला असतो. मात्र, या घाईघाईत आणि एक्साइटमेंटमध्ये अनेकदा आपण घराच्या सौंदर्याकडे लक्ष देतो, पण 'वास्तूकडे' दुर्लक्ष करतो. वास्तुशास्त्रानुसार, घराची दिशा आणि मांडणी योग्य नसेल, तर नवीन घरात सुख-शांतीऐवजी संकटे आणि आर्थिक चणचण भासू शकते.
advertisement
मुख्य प्रवेशद्वाराची दिशा: सर्वात मोठी चूक मुख्य दरवाजाच्या निवडीत होते. वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला प्रवेशद्वार असलेले घर खरेदी करणे टाळावे, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घराचा आकार आणि आजूबाजूचा परिसर: नेहमी चौकोनी किंवा आयताकृती आकाराचेच घर किंवा प्लॉट खरेदी करावा. एल-शेप किंवा कापलेले कोपरे असलेली वास्तू अशुभ मानली जाते. तसेच, घराच्या मुख्य दरवाजासमोर कोणताही मोठा खांब, झाड किंवा अडथळा नसावा, याला 'द्वारवेध' म्हणतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










