'लोकांसाठी जगलेल्यांची नावं...', वडिलांवर आक्षेपार्ह कमेंट; भाजप नेत्याला रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर

Last Updated:
वडिल विलासराव देशमुख यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या भाजप नेत्याला रितेश देशमुखनं त्याच्या स्टाइलनं उत्तर दिलं आहे. काय म्हणाला रितेश?
1/7
अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6 होस्ट करणार आहे. नुकतीच त्याची ग्रँड एन्ट्री झाली. दरम्यान रितेशचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात त्याने भाजप नेत्याला प्रत्युत्तर दिलं. 

advertisement
2/7
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं. रितेशनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 

3/7
सोमवारी लातूरमधील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले,
सोमवारी लातूरमधील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले, "तुमचा उत्साह पाहून मी असे म्हणू शकतो की विलासराव देशमुख यांची स्मृती या शहरातून पूर्णपणे पुसली जाईल." या विधानावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
advertisement
4/7
रितेशनं व्हिडीओ शेअर करत हात जोडले. तो म्हणाला,
रितेशनं व्हिडीओ शेअर करत हात जोडले. तो म्हणाला, "दोन्ही हात जोडून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र!"
advertisement
5/7
रितेशचे वडिल म्हणजे विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांना एक नम्र, प्रगतीशील नेते म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मृत्यूनंतरही, लातूर आणि राज्याच्या इतर भागात त्यांची लोकप्रियता कायम आहे. 

6/7
विलासराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दोन चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा राजकीय वारसा सांभाळत आहेत. रितेश राजकारण नसला तरी राजकीय टिपण्ण्यांवर त्याचं लक्ष असतं. अनेकदा तो त्यावर भाष्य देखील करताना दिसतो. 

7/7
रितेश देशमुख हा वडिलांच्या महत्त्वाच्या दिवशी आवर्जून त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत लातूरला त्यांच्या गावी जातो. त्याची पत्नी जेनिलिया आणि दोन्ही मुलांना देखील गावची ओढ आहे. जेनिलिया देखील अनेकदा सासऱ्यांविषयी भावना व्यक्त करताना दिसते.  

Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement