Cirme : डोक्यावर जोरदार वार; भिवंडीत तरुणावर अमानुष हल्ला, पोलिसांनी सापळा रचत आरोपी पकडला
Last Updated:
Bhiwandi Crime News : भिवंडीतील टेमघर पाडा भागात विकास सिंगवर चार जणांनी लाकडी बांबूने हल्ला केला. जाकीर हुसेन शेखसह चौघांना पोलीसांनी अटक केली.
ठाणे : मागील काही वर्षांत भिवंडी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच टेमघर पाडा भागात खुनाच्या प्रयत्नाची एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
विकास सिंग (वय32) याच्यावर लाकडी बांबूने हल्ला करणाऱ्या जाकीर हुसेन शेख (वय35) याला पोलीसांनी अटक केली आहे. हुसेन या भागात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार,3 जानेवारी रोजी दुपारी टेमघर पाडा भागात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी हुसेनसह अयफाज खान, अजित गौडा आणि अमिन खान या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती नुसार, 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.50 वाजता या चार जणांनी विकास सिंग याच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला करताना अमिन आणि अयफाज यांनी त्याला जबर मारहाण केली. विकासच्या डोक्यावर लाकडी बांबूने जोरदार वार केला पण तो गंभीररीत्या जखमी झाला.
advertisement
विकास सिंगवर झालेल्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे आणि आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 3:09 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Cirme : डोक्यावर जोरदार वार; भिवंडीत तरुणावर अमानुष हल्ला, पोलिसांनी सापळा रचत आरोपी पकडला









