Palghar News : '25 दिन में डब्बल...' लोकांनी पाण्यासारखे पैसे लावले अन्...,13 जणांवर रडण्याची वेळ, पालघरमधील घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेअर मार्केमध्ये पैसा गुंतवून दाम दुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवण्यात आलं होतं. या आमिषाला बळी पडल्याने 13 सर्वसामान्य नागरीकांची घोर फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
Palghar News : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेअर मार्केमध्ये पैसा गुंतवून दाम दुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवण्यात आलं होतं. या आमिषाला बळी पडल्याने 13 सर्वसामान्य नागरीकांची घोर फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.या नागरीकांकडून 2 कोटी 39 लाख 46 हजार 698 रुपयाचा गंडा घातला गेला आहे. त्यामुळे या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
पालघरमध्ये रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यास पैसा दाम दुप्पट करून देण्याचं आमिष देण्यात आलं होतं. या आमिषाला जवळपास अनेक लोक बळी पडले आहे. या नागरीकांची आता फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
या प्रकरणात आता शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा दाम दुप्पट करून देण्याचं आमिष देऊन ग्राहकांना तब्बल 2 कोटी 39 लाख 46 हजार 698 रुपयाचा गंडा घालणाऱ्या खाजगी कंपनीच्या मालकाला अखेर पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक रोशन चंदनलाल जैन वय वर्ष 36 राहणार बोईसर या आरोपीला पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे .
advertisement
2022 पासून बोईसर येथील रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती . यापैकी तेरा गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पालघर पोलीस अधीक्षक यांना दिली असून या तक्रारीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4) , 316 ( 2) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितरक्षण अधिनियम सन 1999 चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
advertisement
दरम्यान या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली असताना पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयात तपासा साठी आणलेल्या या आरोपीकडून उपस्थित पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील हावभाव करून दाखवत मुजोरपणा दाखवला आहे .
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 10:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar News : '25 दिन में डब्बल...' लोकांनी पाण्यासारखे पैसे लावले अन्...,13 जणांवर रडण्याची वेळ, पालघरमधील घटना








