BJP: 'बस्स, एक बंदा काफी है' तरुणाचा पोटतिडकीने विकासाचा सवाल अन् भाजप आमदाराची बोलती बंद, VIDEO व्हायरल

Last Updated:

"साहेब, माझं वय २८ वर्ष आहे, तुम्ही ४ टर्मचे आमदार आहात, मी तुम्हाला दोन टर्म मतदान केलं आहे. पण, तुम्ही म्हणतात इथं रस्त्यांना नंबर नाही. मग..'

(भाजप आमदाराचा व्हिडीओ)
(भाजप आमदाराचा व्हिडीओ)
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर:  राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सर्वत्र जोरदार प्रचार सुरू झाला आहे. प्रचार सभेतून उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचे नेते जनतेला आश्वासन देत मतदान करण्याची विनंती करत आहे. पण, अशातच भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना एका जाहीर सभेत एक तरुण भिडला. 'आम्ही तुम्हाला चार वेळा निवडून दिलं मग रस्ता का झाला नाही?' असा थेट सवाल गावकऱ्यांसमोर विचारला. त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांना पुढे बोलताच आलं नाही, त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना एका जाहीर सभेत जनरोषाचा सामना करावा लागला आहे. गंगापूर तालुक्यातील नवाबपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत विकासकामांचा पाढा वाचत असताना एका स्थानिक तरुणाने थेट रस्त्यांच्या दुरवस्थेवरून प्रश्न विचारला.
"साहेब, माझं वय २८ वर्ष आहे, तुम्ही ४ टर्मचे आमदार आहात, मी तुम्हाला दोन टर्म मतदान केलं आहे. पण, तुम्ही म्हणतात इथं रस्त्यांना नंबर नाही. मग गावाचा रस्ते कुठे आहेत? या एका प्रश्नामुळे सभेतील वातावरण चांगलेच तापलं. आमदार प्रशांत बंब यांनी परत परत हाच प्रश्न का विचारता, आपण पुढे बोलूया ना, असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाच्या प्रश्नामुळे प्रशांत बंब यांना पुढे काही बोलताच आलं नाही.
advertisement
शेवटी आमदारांना सभा अर्धवट सोडून निघून जावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंब जनसंपर्क वाढवण्यासाठी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. पण नवाबपूरच्या सभेत त्यांना चांगल्याच रोषाचा सामना करावा लागला..
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP: 'बस्स, एक बंदा काफी है' तरुणाचा पोटतिडकीने विकासाचा सवाल अन् भाजप आमदाराची बोलती बंद, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement