कडाक्याच्या थंडीचा फटका, शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत केळी बाग करपली, दीड लाखांचं नुकसान
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
त्यांचा 1 एकरमध्ये केळीचा बाग आहे. 1300 झाडांची लागवड यामध्ये आहे. दरवर्षी चांगले उत्पन्न या शेतीतून त्यांना मिळते.
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील गणेश मोरे हे अनेक वर्षांपासून केळीचे उत्पादन घेत आहेत. त्यांचा 1 एकरमध्ये केळीचा बाग आहे. 1300 झाडांची लागवड यामध्ये आहे. दरवर्षी चांगले उत्पन्न या शेतीतून त्यांना मिळते. मात्र यंदा अति थंडीमुळे केळी झाडांची पाने करपली आहेत, फळांवर डाग पडले आहेत, या थंडीचा परिणाम उत्पन्नावर झाला आणि 1.50 लाख रुपयांचे नुकसान मोरे यांचे झाले. शेतीला लावलेला खर्च देखील अद्यापपर्यंत निघालेला नाही त्यामुळे केळीचे उत्पादन घेणे कठीण बनले आहे. यावर केळी उत्पादक शेतकरी गणेश मोरे काय म्हणाले याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पैठण येथे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मोरे हे केळीचे उत्पादन घेत आहेत. मात्र यंदा कडाक्याची थंडी पडल्यामुळे केळीची पाने अक्षरशः जळून गेली आहेत. केळी या पिकाला जास्त पाणी चालते मात्र थंडी हे पीक सहन करू शकत नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये साधारणतः दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गणेश मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
advertisement
थंडीचे प्रमाण कमी असते तर केळीची झाडे चांगले पोसली असती त्यामुळे 15 ते 16 टन केळीचे उत्पादन निघाले असते आणि जवळपास 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, या शेतीसाठी सद्यस्थितीत रोप लागवड, ठिबक, खत-औषधांची फवारणी यासह एकूण खर्च 80 हजार रुपये झाला. बाजारात सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलो भाव सुरू आहे, त्यामुळे खर्चही निघणे कठीण झाले आहे. शासनाकडे देखील मागणी करून काही मिळत नाही मात्र शासनाने केळीच्या दरात भाववाढ करावी, अशी मागणी देखील मोरे यांनी केली.
advertisement
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 7:54 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कडाक्याच्या थंडीचा फटका, शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत केळी बाग करपली, दीड लाखांचं नुकसान









