Raigad: रायगडच्या समुद्राकिनाऱ्यावर पहिल्यांदाच 'तो' आला, उचलायला 7 ते 8 माणसं लागली, दुर्मिळ अशा घटनेचे PHOTOS

Last Updated:
समुद्राच्या दुनियेत अनेक असे जीव आहे, जे आजपर्यंत आपण कधी पाहिलेही नसतील. अशातच रायगड–रत्नागिरी किनारपट्टीवर आज एक दुर्मीळ आणि आशादायी घटना घडली. (शिवाजी गोरे, प्रतिनिधी)
1/13
समुद्राच्या दुनियेत अनेक असे जीव आहे, जे आजपर्यंत आपण कधी पाहिलेही नसतील. अशातच रायगड–रत्नागिरी किनारपट्टीवर आज एक दुर्मीळ आणि आशादायी घटना घडली. बागमांडला फेरीबोट जेट्टी परिसरात ओहोटीमुळे चिखलात अडकलेले नर ग्रीन सी टर्टल आढळून आले. ग्रीन सी टर्टल ही एक अत्यंत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहे. खास करून या प्रजातीचा 'नर' किनाऱ्यावर दिसणे ही अतिशय दुर्मीळ घटना मानली जाते.

advertisement
2/13
बागमांडला फेरीबोट जेट्टी परिसरात ओहोटीमुळे चिखलात अडकलेले नर ग्रीन सी टर्टल आढळून आले. ही माहिती मिळताच तातडीने Mangrove Cell (ACF व RFO, अलिबाग) यांना कळवण्यात आली.

3/13
प्रत्यक्ष पाहणीत हे कासव आकाराने अत्यंत विशाल असल्याचे स्पष्ट झाले. डोके ते शेपटी सुमारे १९० सें.मी., पाठीची लांबी ६५ सें.मी., रुंदी ६२.५ सें.मी. होती. शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे निष्पन्न झाले.

4/13
बीच मॅनेजर्स, मॅनग्रोव्ह सेलचे गार्ड्स, स्थानिक नागरिक आणि फेरीबोटीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कासवाला सुरक्षितरीत्या उचलून जुन्या जेट्टीजवळील पाण्यात सोडण्यात आले.

5/13
पण, या कासवाला उचलून नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. साधारणपणे नर ग्रीन सी टर्टल हे ६ फुटांचे होते. तर वजन हे २०० ते २५ किलो असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या कासवाला उचलून नेत्यांना ७ ते ८ कर्मचाऱ्यांची मदत लागली.

6/13
कासवाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली. एका जाळीवर या कासवाला ठेवण्यात आलं, त्यानंतर जाळीला पकडून या कासवाला चिखलातून उचलून दुसरीकडे नेण्यात आलं.

7/13
कासवाला जेव्हा पाण्यात सोडलं तेव्हा अवघ्या मिनिटाभरातच कासवाने स्वतःहून पाण्यात प्रवेश करत खोल समुद्राकडे झेप घेतली.

8/13
विशेष म्हणजे, रायगड–रत्नागिरी किनारपट्टीवर नर ग्रीन सी टर्टल प्रथमच आढळल्याची नोंद झाली असून, यामुळे सागरी जैवविविधतेबाबत नवी आशा निर्माण झाली आहे.

9/13
नर कासव हे सहसा समुद्र किनाऱ्यावर येत नाही. नर कासवाची शेपूट ही लांब असते, त्यावरून नर आणि मादी असल्याची ओळख होते. नर कासवाची शेपटूही कवचाच्या बाहेर असते. तर मादीची शेपूटही छोटी असते आणि कवचाच्या आत असते.

10/13
मादी कासव हे समुद्राच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात, पण नर कधीही समुद्र किनाऱ्यावर येत नाहीत. नर कासव हे संपूर्ण आयुष्य हे समुद्रात असतं. त्यामुळे रायगडमध्ये आढळलेलं कासवं ही एक दुर्मिळ अशी घटना होती.

11/13
खरंतर ग्रीन टर्टल कासवाला ग्रीन हे नाव त्याच्या कवचामुळे मिळालं नाही. त्याचं कवच हे हिरवे नाही. तर कवचाखाली असलेली हिरव्या रंगाची चरबी ही हिरव्या रंगाची आहे, त्यामुळे त्याला ग्रीन सी टर्टल असं म्हटलं जातं.

12/13
ग्रीन कासव हे पूर्णपणे शाकाहारी असते. समुद्रातील गवत आणि शैवाळ हे त्याचं खाद्य असतं. ही कासवे जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय सागरी क्षेत्रात आढळतात.

13/13
 महाराष्ट्रात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले कासवे आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्गातील देवबाग आणि आता रायगडमध्ये ग्रीन सी टर्टल आढळले आहे. त्यामुळे ही एक दुर्मिळ अशी घटना म्हणून पाहिली जात आहे.

Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement