अभिजीत मुहूर्तावर कॅटरीनाने ठेवलं लेकाचं नाव, आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व; मिसेस कौशलने का निवडला आजचा दिवस?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, आणि याच शुभ मुहूर्तावर बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आज 7 जानेवारी 2026 रोजी मंगळवार असून हिंदू पंचांगानुसार आज पौष कृष्ण पंचमी आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष कृपा मानली जाते. मंगळवार हा शुभ कार्यासाठी, विशेषतः नाव ठेवण्यासाठी शुभ मानला जातो. विकी-कतरिनाने आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या 'मंगल' कार्यासाठी बाप्पाचा वार निवडल्याचे बोलले जात आहे.
advertisement
advertisement
कदाचित अनेकांना माहिती नसेल, पण विकी कौशलच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातील त्याच्या पात्राचे नाव 'मेजर विहान सिंह शेरगिल' असे होते. ज्या नावामुळे विकीला घराघरात ओळख मिळाली, तेच नाव त्याने आपल्या मुलाला देऊन एक प्रकारे त्या पात्राशी आणि यशाशी आपले भावनिक नाते जोडले आहे.








