WhatsAppचा नवा धमाका! आणले 3 भारी अपडेट्स, सोपं होईल तुमचं काम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नव्या वर्षाच्या सुरुवातीला WhatsApp ने आपल्या यूझर्ससाठी गुड न्यूज आणली आहे. कंपनीने ग्रुप चॅट्ससाठी एकाचवेळी तीन नवे अपडेट्स, आणलेय. हे अपडेट्स कोणते आहेत पाहूया...
advertisement
advertisement
मेंबर टॅग्ज - या अपडेटमुळे यूझर्सना विशिष्ट ग्रुपमध्ये स्वतःला लेबल किंवा रोल देऊ शकतील. ज्यामुळे इतर सदस्यांना ते कोण आहेत हे समजणे सोपे होते. हे टॅग्ज कस्टमाइज करता येतात. याचा अर्थ असा की यूझर स्पोर्ट्स ग्रुपमध्ये गोलकीपर म्हणून स्वतःला टॅग करू शकतो. तर शाळेच्या ग्रुपमध्ये ते आर्ट टीचरचा टॅग वापरू शकतात. हे अपडेट विशेषतः मोठ्या ग्रुपमध्ये उपयुक्त ठरेल जिथे लोक एकमेकांना इंडिव्हिज्युअल ओळखत नाहीत.
advertisement
advertisement
स्मार्ट इव्हेंट रिमाइंडर्स - दुसऱ्या अपडेटसह, व्हॉट्सअॅपने इव्हेंट रिमाइंडर्स अधिक स्मार्ट बनवले आहेत. ग्रुपमध्ये इव्हेंट तयार करताना, यूझर आता पार्टिसिपेंट्ससाठी कस्टम रिमाइंडर्स सेट करू शकतात. यामुळे पार्टिसिपेंट्समध्ये हा पर्सन इव्हें आहे की व्हर्च्युअल मीटिंग आहे याबद्दलचा गोंधळ दूर होईल. यावरुन कळतं की, व्हॉट्सअॅप फक्त मेसेजिंगच्या पलीकडे जाऊन ग्रुप्सना प्लॅनिंग हबमध्ये रूपांतरित करू इच्छित आहे.









